शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

वंशाच्या दिव्यासाठी पणती विझवू नका

By admin | Updated: November 17, 2016 06:55 IST

वंशाला दिवाच पाहिजे, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या आई-बाबांनी पणती विझणार नाही, याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. कारण पणतीमुळेच

चिकणघर : वंशाला दिवाच पाहिजे, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या आई-बाबांनी पणती विझणार नाही, याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. कारण पणतीमुळेच दिवा उजळण्याची वाट मोकळी होते. याची जाणीव ठेऊन जन्माला येणाऱ्या मुलीला जगू द्या, तिला मोकळा श्वास घेऊ द्या, अशी साद कीर्तनकार हभप विनता पाटील यांनी उपस्थित जनसमुदायाला घातली.गौरीपाडा येथे कार्तिक स्नाननिमित्त झालेल्या हरिनाम कीर्तन सोहळा झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कल्याण परिसरातील वारकरी महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलांवर संस्कार करण्याचे आई-बाबांचे केवळ कर्तव्यच नाही तर जबाबदारीही आहे. सध्याच्या जागतिकीकरणामुळे मानवी जीवन वेगवान झाले आहे. याचा परिणाम संस्कार बिघडण्यात झाला आहे, असे सांगून चाकरमानी महिला मुलांच्या संगोपनासाठी वेळ देऊ शकत नाहीत. सहा महिन्यांच्या अपत्याला त्यांना पाळणा घरात ठेवावे लागत आहे. यामुळे अशा मुलांना आईच्या मायेची ऊब मिळत नाही. त्यातच टीव्हीसारख्या यंत्राने घराघरात वेड लावल्यामुळे संस्कार आणि संस्कृती या दोन्हीवर परिणाम होत आहे. म्हणून मुलगा असो वा मुलगी भेदभाव न करता ते अज्ञानातून सज्ञानात प्रवेश करीपर्यंत आईबाबांनी आपल्या मुलांवर स्वत: संस्कार करण्यावर भर देण्याची गरज असते, असा प्रबोधनात्मक सल्ला पाटील यांनी कीर्तनातून दिला. कोजागिरी ते कार्तिक त्रिपुरा पौर्णिमा, असा महिनाभर हा कार्यक्रम सुरू होता. (वार्ताहर)