शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

संघावरील टीकेकडे लक्ष देऊ नका

By admin | Updated: October 12, 2016 04:31 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची अनुभूती घ्यावी. परकीयांनी आक्रमण करू नये, यासाठी प्रभावी हिंदू संघटना आवश्यक आहे. प्रसिद्धी माध्यमांमध्ये होणाऱ्या टीकेकडे लक्ष न देता नागरिकांनी

डोंबिवली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची अनुभूती घ्यावी. परकीयांनी आक्रमण करू नये, यासाठी प्रभावी हिंदू संघटना आवश्यक आहे. प्रसिद्धी माध्यमांमध्ये होणाऱ्या टीकेकडे लक्ष न देता नागरिकांनी संघाच्या कार्यात डोळसपणे सहभागी व्हावे, असे आवाहन संघाच्या कोकण प्रांताचे बौद्धिक प्रमुख उदय शेवडे यांनी केले. डोंबिवलीत विजयादशमीनिमित्त मंगळवारी संघाचे संचलन व उत्सव झाला. त्यावेळी ते बोलत होते. खरे तर विजयादशमीचा उत्सव देशभर २८ सप्टेंबरपासूनच सुरु झाल्याचे सांगत त्यांनी नकळत सर्जिकल हल्याची आठवण करुन दिली. संघाने गणवेशात बदल केल्यामुळे त्याची सध्या चर्चा होत आहे असे त्यांनी सांगितले. स्वयंसेवकांना भगवा ध्वज हा गुरुस्थानी असून समाजाला अनुसरूनच परिवर्तन केले जाते. संघाच्या परिवारात अनेक सामाजिक संघटना निर्माण झाल्या. त्या त्या परिस्थितीनुसार बदल झाल्याचे सांगून आजमितीस ४० संघटना प्रमुख भूमिका घेत कार्यरत आहेत असे त्यांनी नमूद केले.सामाजिक संघटन, समरसता हे महत्त्वाचे मानत सेवा विभाग सुरु झाला. आज सुमारे एक लाख सेवा कार्यकर्ते कार्यरत आहे. दैनंदिन शाखा तसेच २०१० पासून जनजागरण श्रेणी अशा दोन भागांमध्ये संघाचे कार्य अधिक जोमाने सुरु झाले, असे त्यांनी सांगितले. पूर्वांचलमधील समस्या सोडविण्याचा विडा संघाने उचलला. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे शेवडे यांनी सांगितले. त्यामुळे विविध स्तरांवर संघाचे कार्य अव्याहतपणे सुरु असून त्यात समाजाने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.