शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

ठामपा कर्मचाऱ्यांना १५,५०० ची दिवाळी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 01:21 IST

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांसह टीएमटीच्या कर्मचा-यांना दिवाळीपूर्वी १५ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर झाले आहे.

ठाणे : ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांसह टीएमटीच्या कर्मचा-यांना दिवाळीपूर्वी १५ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात ४०० रुपयांची वाढ केली असल्याचा दावा म्युनिसिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव यांनी केला. कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदान म्हणून एक महिन्याचा अतिरिक्त पगार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महापालिकेवर १२ कोटी ८३ लाख नऊ हजार रु पयांचा बोजा पडणार आहे.महापालिकेचे आठ हजार २७८ कायमस्वरूपी कर्मचारी असून कंत्राटी कामगारांची संख्या अडीच हजारांच्या घरात आहे. दिवाळीच्या सानुग्रह अनुदानाची रक्कम आधीच जाहीर झाल्याने कर्मचाºयांची दिवाळी गोड होणार आहे. ठाणे पालिकेच्या विविध विभागांतील आठ हजार कर्मचाºयांच्या दिवाळी सानुग्रह अनुदानाचा निर्णय शुक्रवारी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि म्युनिसिपल लेबर युनियन अध्यक्ष रवी राव यांच्या बैठकीत घेण्यात आला. टीएमटी कर्मचाºयांनाही एवढेच सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. कंत्राटी कामगारांनी एका महिन्यात जेवढी हजेरी लावली आहे, तेवढा एका महिन्याचा बोनस म्हणून देण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेत कायमस्वरूपी कर्मचाºयांची संख्या पाच हजार ८३ एवढी आहे. अनुकंपा वारसा तत्त्वावरील कर्मचारी दोन हजार ५८, ठामपा ठोक पगारावरील कर्मचारी २५२, शिक्षण विभागातील कर्मचारी एक हजार ५१, शिक्षण विभागातील ठोक पगारावर कर्मचारी २३ असे एकूण आठ हजार २७८ कर्मचारी कार्यरत आहेत.>महापालिका कामगार कर्मचाºयांना मागील तीन आर्थिक वर्षांत अदा करण्यात आलेल्या सानुग्रह अनुदानात २०१४-१५ मध्ये १२ हजार ५००, २०१५-१६ मध्ये १३ हजार २५०, २०१६-१७ मध्ये १४ हजार, २०१७-१८ मध्ये १५ हजार १००, तर २०१८-१९ मध्ये १५ हजार ५०० रुपये मंजूर केले आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका