शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणामुळे भिवंडीत वाढले क्षयाचे रूग्ण

By admin | Updated: September 15, 2015 23:09 IST

शहरातील कल्याणरोड परिसरांत मोठ्या संख्येंने मोती कारखाने असून त्यातून पसरणाऱ्या प्रदूषणांतून आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये क्षयरोगाची लागण झाल्याचे आढळून आले असून नागरिकांच्या

- पंढरीनाथ कुंभार,  भिवंडीशहरातील कल्याणरोड परिसरांत मोठ्या संख्येंने मोती कारखाने असून त्यातून पसरणाऱ्या प्रदूषणांतून आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये क्षयरोगाची लागण झाल्याचे आढळून आले असून नागरिकांच्या जीवितास घातक बनलेले मोती कारखाने बंद करण्याची मागणी होत आहे. शहरात कल्याणरोड परिसरांतील नवी वस्ती, बाबला कंपाऊण्ड, रावजीनगर, नारायण कंपाऊण्ड, गणेश सोसायटी, पाईपलाईन, शांतीनगर आदी परिसरांत मोठ्या संख्येने मोती कारखाने आहेत. त्यात प्लॅस्टीकच्या दाण्यापासून मणी तयार करतात. त्यावर कोटींग करून मोती रंग दिला जातो. त्यामुळे ते मोत्यासारखे चमकतात. या मोतीसारख्या दिसणाऱ्या मण्यांना मुंबईतील मार्केटमध्ये भरपूर मागणी असल्याने शहरांत शेकडोच्या संख्येने मोती कारखाने सुरू आहेत. दाट लोकवस्तीमध्ये ते असल्याने तेथे वापरण्यात येणाऱ्या घातक रासायनिक पदार्थांचे व द्रव्यांचे प्रदूषण या लोकवस्तीत पसरल्याने नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो आहे. मण्यांवर कोटींग करताना होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेतून परिसरांत ते होते. त्यामुळे नागरिकांना चक्कर येणे, जीव गुदमरणे, फुफ्फुसाचे आजार व क्षयरोग असे आजार होत आहेत. नागरिकांच्या जीवास धोका निर्माण करणारे प्रदूषण मोती कारखान्यापासून होते याची माहिती प्रदूषण विभाग व फॅक्टरी विभागास आहे. तरीदेखील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय तसेच प्रदूषण विभागाने अद्याप या कारखानदारांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले नाहीत. त्यामुळे परिसरांतील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. प्लॅस्टीकच्या दाण्यापासून मणी बनविल्यानंतर त्यावर कोटींग करण्यासाठी इन्थोल क्लोराईड व मिथॉल क्लोराईड ही केमीकल वापरली जातात. त्यापासून लेमोनायटीस(फुफ्फुस सुकणे), टी.बी. (क्षयरोग)होतात. याबाबत लेखी तक्रारी देऊनही संबधित शासकीय अधिकारी कारवाईस टाळाटाळ करतात.- मुकेश लांबोळे, तक्रारदार, डार्इंग प्रयोगशाळा इन्चार्ज