शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आईपर्यंत जेवणाचा डबा पोहोचलाच नाही

By admin | Updated: December 31, 2014 01:00 IST

तहानलेल्या जन्मदात्यांना पाणी घेऊन जाताना वाटेतच मृत्यूने गाठल्याची श्रावणबाळाची कथा सर्वांनाचा माहित आहे. अशीच काहीशी दुर्देवी घटना मंगळवारी सायन येथे घडली.

नवी मुंबई : तहानलेल्या जन्मदात्यांना पाणी घेऊन जाताना वाटेतच मृत्यूने गाठल्याची श्रावणबाळाची कथा सर्वांनाचा माहित आहे. अशीच काहीशी दुर्देवी घटना मंगळवारी सायन येथे घडली. के. ई. एम रुग्णालयात उपाचार घेणाऱ्या आईसाठी जेवणाचा डबा घेऊन जाणाऱ्या शेखर भावळे या तरूणाचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. मुलाच्या वाटेकडे डोळेलावून बसलेल्या आईला मृत्यूी वार्ता ऐकावी लागेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. या घटनेने आईला जबर धक्का बसला.कोपरखैरणे सेक्टर ८ येथे शेखर भावळे सहकुटुंब राहायला होता. आईला गुडघे दुखीचा त्रास असल्याने त्याने काही दिवसांपूर्वी मुंबईच्या के. ई. एम. रुग्णालयात दाखल केले होते. नुकतीच गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. आईसाठी शेखर दररोज घरून जेवणाचा डबा घेवून जायचा. परंतु मंगळवारी या मातेपर्यंत डबा पोहोचलाच नाही. शेखर नेहमीप्रमाणे सकाळी जेवणाचा डबा घेऊन मोटरसायकलवरून मुंबईकडे निघाला. तो सायन येथे आला असता त्याची मोटरसायकल व्होल्वो बसला धडकली. यात बसच्या चाकाखाली सापडल्याने शेखरचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी रात्री त्याच्यावर कोपरखैरणे येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. सामाजिक संघटनांच्या माध्यमातून केलेल्या कार्यामुळे तो अनेकांना परिचित होता. त्यामुळे त्याच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)च्गेले काही दिवस दररोज डबा घेऊन जाणाऱ्या शेखरबाबत मंगळवारी नियतीच्या मनात वेगळाच खेळ सुरू होता. च्नेहमीप्रमाणे शेखर कोपरखैरणेतून जेवणाचा डबा घेऊन मोटारसायकलने निघाला खरा मात्र सायन त्याची मोटारसायकल व्होल्वो बसला धडकली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. च्डब्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेखरच्या आईपर्यंत काळजाला चटका देणारी मुलाच्या मृत्यूचीच बातमी पोहोचली.च् शेखरच्या जाण्याने भावळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शेखर कुटुंबातील कमवता मुलगा होता.