शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

धूर फवारणीतले डिझेलच गायब

By admin | Updated: December 18, 2014 01:17 IST

एकीकडे साथीच्या रोगाबरोबरीने डेंग्यू-मलेरियासारखे गंभीर आजार डोके वर काढत असताना त्यांंच्यावर मात करणा-या फवारणीतील डिझेलच गायब

मनीषा म्हात्रे, मुंबईएकीकडे साथीच्या रोगाबरोबरीने डेंग्यू-मलेरियासारखे गंभीर आजार डोके वर काढत असताना त्यांंच्यावर मात करणाऱ्या फवारणीतील डिझेलच गायब झाल्याचा आरोप झाला असून याची तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे डिझेलच गायब झाल्याने फवारणी रोखल्याने पालिका प्रशासन नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचे समोर येत आहे.स्थानिक नगरसेवक रूपेश वायंगणकर यांनी प्रभाग समितीच्या बैठकीत हा आरोप केला आहे. प्रशासनाच्या नियमावलीनुसार, प्रत्येक वॉर्डनिहाय फवारणी मशिनसाठी प्रतिदिन २४ लीटर डिझेल पुरविणे गरजेचे आहे. एका मशिनमधून सहा वेळा फिलिंग करावे लागते. २४ लीटरऐवजी दिवसाला १० ते १३ लीटर डिझेल पुरविण्यात येत असल्याचा आरोप वायंगणकर यांनी केला. भांडुप एस विभागात १३ नगरसेवक आहेत. अशात वर्षाकाठी प्रत्येक नगरसेवकामागे ८ हजार ७६० लीटर डिझेल पुरविण्यात येते. एकूणच पालिकेच्या एस वॉर्ड अंतर्गतच वर्षाकाठी १ लाख १३ हजार ८८० लीटर डिझेल पुरविणे गरजेचे असताना फक्त अर्ध्याहूनही कमी डिझेलच पुरविण्यात येत असल्याने उर्वरित हजारो लीटर डिझेल जाते कुठे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सध्याच्या डिझेलच्या भावाने जर याची तुलना केली असता, एकाच विभागात ६८ लाख ३२ हजार ८०० रुपये खर्च होत आहेत. प्रत्यक्षात एवढ्या पैशांच्या अर्ध्या किमतीचेही डिझेल नसल्याने यात मोठा घोटाळा होत असल्याचा आरोपही वायंगणकर यांनी केला. फक्त एस विभागाची ही अवस्था असेल तर मुंबईत पालिकेचे २४ वार्ड असून २२७ नगरसेवक आहेत. तर प्रत्येक नगरसेवकाच्या तुलनेत वर्षाकाठी एकूण लाखो लीटर डिझेल मिळणे अपेक्षित असताना त्यातही हेराफेरी होत असल्याचा संंशय व्यक्त करण्यात येत आहे. जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ठरावीक वेळी धूर फवारणी करण्यात येते. त्यासाठी गरजेनुसार फवारणीसाठी लागणारे डिझेल पुरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.