शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तीन खाडीकिनाऱ्यांचा बेल्जिअमद्वारे विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2015 00:32 IST

गेल्या वर्षभरापासून निधीअभावी धूळखात पडलेला वॉटर फ्रंट अर्थातच खाडीकिनाऱ्याचा विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा एकदा ठाणे महापालिकेने पटलावर आणला आहे.

ठाणे : गेल्या वर्षभरापासून निधीअभावी धूळखात पडलेला वॉटर फ्रंट अर्थातच खाडीकिनाऱ्याचा विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा एकदा ठाणे महापालिकेने पटलावर आणला आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यासंदर्भात बुधवारी बैठक घेऊन खाडीकिनाऱ्याचा तीन टप्प्यांत विकास करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बुधवारी सकाळी बेल्जिअमस्थितने पोलिसन या संस्थेचे क्रिस पोलिसन, गुल कृपलानी आणि महापालिका अधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या कामाला गती मिळावी, यासाठी अतिरिक्त नगर अभियंता अनिल पाटील यांच्या अधिपत्याखाली विशेष कक्षाची निर्मिती केली असून त्यामार्फत १० नोव्हेंबरअखेर या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी स्वारस्य देकार अभिव्यक्ती प्रक्रि या पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पालिकेने सुरुवातीला हा संपूर्ण प्रकल्प बीओटीवर राबविण्याचे निश्चित केले होते. आता तीन टप्प्यांत हा प्रकल्प राबविण्यात येणार असून पहिला टप्पा हा महसूली उत्पन्नाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, अशा पद्धतीने विकसित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. दुसऱ्या टप्प्यात खासगी लोकसहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये हा प्रकल्प महापालिका आणि वित्तीय संस्थेकडून आर्थिक साहाय्य घेऊन राबविण्याबाबत त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.