शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
4
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
5
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
6
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
9
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
10
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
11
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
13
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
14
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
15
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
16
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
17
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
18
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
19
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
20
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

काळाबाजार थांबवणाऱ्या बायोमेट्रीकला विलंब

By admin | Updated: October 26, 2015 00:50 IST

शिधावाटप (रेशनिंग) दुकानांवरील धान्य, रॉकेल, साखरेसह अन्नधान्याचा काळाबाजार थांबवण्यासाठी ‘बायोमेट्रीक सिस्टीम’ची तयारी पूर्ण झाली आहे.

सुरेश लोखंडे, ठाणेशिधावाटप (रेशनिंग) दुकानांवरील धान्य, रॉकेल, साखरेसह अन्नधान्याचा काळाबाजार थांबवण्यासाठी ‘बायोमेट्रीक सिस्टीम’ची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, त्याच्या अंमलबजावणीस विलंब होत असल्यामुळे ग्राहकांमध्ये तर्कवितर्क काढले जात आहेत. यासाठी दोन टप्प्यांमध्ये कामाचे नियोजन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात सगळ्या शिधापत्रिकांची संगणकीय नोंद करण्यात आली. भारत सरकारचा खाद्य निगम विभाग ते तालुकास्तरावर होणाऱ्या धान्यवाहतुकीचे संगणकीकरण, पुरवठा विभागाच्या विविध कार्यालयांचे संगणकीकरण झाल्याचे सांगितले जात आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात एफपीएस अ‍ॅटोमेशन म्हणजे प्रत्येक शिधावाटप दुकानावर बायोमेट्रीक यंत्र बसवणे अपेक्षित आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुमारे ५५४ शिधावाटप धान्य दुकाने आहेत. त्यावरील सुमारे एक लाख ९५ हजार कार्डधारकांच्या शिधापत्रिका तपासण्याचे काम पूर्ण झाले आहे. महापालिका क्षेत्रात सर्वाधिक रेशनिंग दुकाने असून त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्राहकांचीदेखील सर्व प्रकारची तपासणी, नोंदणी आधीच पार पडली आहे. यामध्ये विशेषत: आधारकार्ड, बँक खाते क्रमांक, मोबाइल नंबर यांचीही नोंद झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईमुळे गोरगरीब भरडले जात आहेत. यावर पर्याय म्हणून रेशनिंग दुकानांत जावे तर तेथे नेहमीप्रमाणे कोटा आला नसल्याचे उत्तर त्याला मिळते. त्यामुळे कार्डधारक मोठ्या विवंचनेत सापडले आहेत. बायोमेट्रीक लागू झाले असते तर त्याचे धान्य त्यास महिनाभरात कधीही घेता आले असते. यामुळेच बायोमेट्रीक सिस्टीम लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. स्वस्त धान्य दुकानांवर केंद्र तसेच राज्य शासनाव्दारे शिधापत्रिकाधारकांना जीवनावश्यक अन्नधान्य, खाद्यतेल, रॉकेल, गहू, तांदूळ, साखर स्वस्तात मिळणे अपेक्षित आहे. डाळीचे भाव वाढल्यामुळे गोरगरिबांच्या तोंडचा डाळभातही हिरावला गेला. यावर, मात करण्यासाठी रेशनवर सवलतीच्या दराने कार्डधारकांना डाळी मिळण्यासाठी उपाय करण्याची गरज आहे.