शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाला दिले कोविड कचऱ्याचेही बिल, रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 02:38 IST

कल्याणमधील धक्कादायक प्रकार : शिवसेना नगरसेवकाची रुग्णालयावर धडक

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूट केली जात आहे. एका रुग्णालयाचा कोविड दर्जा महापालिकेने रद्द केल्याची घटना ताजी असताना एका खाजगी रुग्णालयातील महिला रुग्णाच्या बिलात पीपीई किटसह कोविड कचरा विल्हेवाटीचा खर्चही समाविष्ट करण्यात आला होता. तसेच बिल न भरल्याने तिला डिस्चार्ज दिला नव्हता. हा प्रकार कळताच पीपीई किट घालून शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड रुग्णालयात पोहोचले. महिला रुग्णाला उचलून त्यांनी घरी नेऊन सोडले. याप्रकरणी रुग्णालयाच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

कल्याण पूर्वेतील एका कोरोनाबाधित महिलेला उपचारासाठी पश्चिमेतील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. तिला १० दिवसांच्या उपचाराचे बिल देण्यात आले. त्यात पीपीई किटचे ५० हजार रुपये तसेच तिच्यापासून तयार झालेल्या जैववैद्यकीय कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठीचा खर्च लावला आहे. त्यामुळे आलेल्या अव्वाच्या सव्वा बिलामुळे तिच्या नातेवाइकांनी गायकवाड यांच्याकडे धाव घेतली. गायकवाड यांनी बिल पाहून पीपीई किट परिधान करत थेट रुग्णालय गाठले. रुग्णालय व्यवस्थापनाला त्यांनी याप्रकरणी जाब विचारला असता तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली.महिलेस दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज दिला होता. मात्र, तिने बिल न भरल्याने तिला रुग्णालयातून सोडले नव्हते, असे त्यांनी सांगितले. गायकवाड यांनी थेट महिलेला वॉर्डमधून उचलून आणत तिच्या घरी सोडले. याप्रकरणी महापालिकेने संबंधित रुग्णालयाच्या विरोधात कारवाई करावी. तसेच याप्रकरणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही दाद मागितली जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.यासंदर्भात संबंधित रुग्णालय व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी काही बोलण्यास नकार दिला आहे. तसेच रुग्णालय प्रशासनाने या घटनेनंतर नरमाईची भूमिका घेतली आहे. संबंधित महिलेचे बिल कमी केल्याचे सांगितले आहे.‘अशा रुग्णालयांवर कारवाई करा’केडीएमसी हद्दीतील २६ कोविड रुग्णालयांनी त्यांचा कोविड कचरा मनपाच्या जैववैद्यकीय कचरा प्रकल्पास देणे बंधनकारक आहे. अनेक रुग्णालये हा कचरा देत नसल्याने महापालिकेने त्यांना दंड ठोठावला आहे.महापालिकेस कचरा न देता दंडात्मक कारवाईस सामोरे जाणारी रुग्णालये अशा प्रकारे रुग्णांकडून कचरा विल्हेवाट लावण्यासाठी पैसा वसूल करत असतील आणि तो महापालिकेस देत नसतील, तर ही रुग्णांची लूट आहे.त्यामुळे अशा रुग्णालयांविरोधात महापालिकेने अधिक कठोर कारवाई करावी, याकडे गायकवाड यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkalyanकल्याणhospitalहॉस्पिटल