शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नागरी समस्यांसाठी नगरसेविकेचे उपोषण

By admin | Updated: March 21, 2017 01:47 IST

शिवसेनेच्या प्रभाग क्र.१३ मधील नगरसेविका तारा घरत यांनी प्रभागातील विविध नागरी समस्यांच्या निवारणासाठी सोमवारी

भार्इंदर : शिवसेनेच्या प्रभाग क्र.१३ मधील नगरसेविका तारा घरत यांनी प्रभागातील विविध नागरी समस्यांच्या निवारणासाठी सोमवारी आयुक्त दालनाबाहेर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करीत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला. मीरा-भार्इंदर महापालिकेमार्फत आझादनगर या आरक्षण क्र. १२२ जागेत बाळासाहेब ठाकरे स्मारक प्रस्तावित करण्यात आले आहे. या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत औद्योगिक वसाहती व झोपड्या आहेत. त्यांना हटवल्याखेरीज तेथे स्मारकासाठी जागा उपलब्ध होणे शक्य नाही. त्यामुळे अनेक महिन्यांपासून बासनात गुंडाळून ठेवलेली तोड कारवाई त्वरित सुरू करून ती जागा स्मारक उभारणीसाठी मोकळी करावी. गोडदेव येथील नागरी सुविधा भूखंडावरील स्मशानभूमीचे अनेक महिन्यांपासून आधुनिकीकरण सुरू आहे. ते अद्याप पूर्णावस्थेत आले नसल्याने नागरिकांना अंत्यविधीत अडचण होते आहे. तसेच प्रभाग क्र. १३ मधील अंतर्गत वाहतूक रस्त्यांवर अतिक्रमणे वसली आहेत. त्यावर प्रशासन उदासीन असल्याने अतिक्रमणे वाढत आहेत. गोल्डन नेस्ट सर्कल ते क्रीडासंकुलापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून खोदून ठेवला आहे. त्यामुळे पादचारी व वाहनांना तेथून येजा करणे त्रासदायक ठरत आहे. या रस्त्याचे लवकरात लवकर काँक्रिटीकरण करावे. प्रभागातील क्रीडा संकूल सुरू करावे, यासाठी देखील त्यांनी आवाज उठवला होता. प्रभागातल्या या नागरी समस्या सोडवण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत असूनही प्रशासनाने त्यावर कोणतीही कार्यवाही न केल्याने अखेर नाइलाजास्तव उपोषण करावे लागल्याचे त्यांनी सांगितले. यावर प्रशासनाने स्मशानभूमीचे काम ३० मार्चपर्यंत पूर्ण करू, असे लेखी आश्वासन घरत यांना दिले. इतर नागरी समस्यांबाबत प्रशासनाकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यानेच त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे सांगितले जात आहे. घरत यांच्या उपोषणाला सेनेच्या सर्व नगरसेविका तसेच नगरसेवकांनी पाठिंबा दिला. (प्रतिनिधी)