शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी महासभेत पाणी पेटले ड्रेनेजवरून नगरसेवकांचा विरोध

By admin | Updated: September 30, 2015 00:04 IST

महानगरपालिका क्षेत्रात सणांच्या काळात वेळेवर पाणी उपलब्ध न झाल्याचा आरोप करून नगरसेवकांनी मंगळवारी महासभेत प्रशासनास धारेवर धरले

भिवंडी : महानगरपालिका क्षेत्रात सणांच्या काळात वेळेवर पाणी उपलब्ध न झाल्याचा आरोप करून नगरसेवकांनी मंगळवारी महासभेत प्रशासनास धारेवर धरले. तर सायंकाळी सभा संपताना केलेल्या ड्रेनेजच्या विषयास नगरसेवकांनी हरकत घेऊन मंचाकडे धाव घेतली. दुपारी १२ वाजता सुरू झालेली महासभा जेवणाची सुट्टी वगळता सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत चालली.मनपा उपायुक्त विजया कंठे यांच्या विरोधातील ठराव व स्थायी समितीच्या सदस्यांची निवड या दोन विषयांकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष होते. त्यासाठी नागरिकांनी कार्यालयाच्या परिसरांत गर्दी केली होती. परंतु, महापौरांनी हे दोन्ही विषय आयत्यावेळी तहकूब केले. सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर पाण्यावर दीड तास तास चर्चा सुरू होती. दरम्यान, स्थायी समिंती सदस्य सुभाष माने यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी संजय म्हात्रे यांची निवड केल्याचे महापौर तुषार चौधरी यांनी जाहिर केले. मनपा आयुक्त व शिवसेना गटनेता दिलीप गुळवी यांनी यांनी केलेल्या चर्चेनुसार ही घोषणा केल्याचे महापौरांनी जाहिर केले. मात्र त्यांनी स्थायी समितीच्या सात सदस्यांच्या निवडीचा विषय आयत्यावेळी तहकूब केला. नगरसेवक विलास पाटील यांनी केंदाकडून रस्त्यासाठी मिळणाऱ्या निधीसाठी ठराव करण्याची सुचना केली असता आयुक्तांनी अंजूरफाटा ते वंजारपाटी नाका रस्त्यासाठी ६९ कोटी रुपयांचा प्रस्ताव सभागृहापुढे सादर केला. महापौरांनी केंद्राच्या नगरोत्थान योजनेतून ड्रेनेज स्किमसाठी ७० टक्के राष्ट्रीय अनुदान मिळविण्याचा ठराव घेतला असता तो घेऊ नये यासाठी नगरसेवकांनी महापौराच्या मंचापर्यंत धाव घेतली. त्यामुळे महासभा गाजल्याची चर्चा मनपा वर्तुळात होती.