शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक सुधाकर चव्हाण यांना अटक

By admin | Updated: November 10, 2015 02:55 IST

बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्ये-प्रकरणी ‘सुसाइड नोट’मुळे मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामिनावर असलेले मनसेचे माजी गटनेते तथा

येऊरच्या बंगल्यात बेकायदा मद्यसाठा ठाणे : बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्ये-प्रकरणी ‘सुसाइड नोट’मुळे मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामिनावर असलेले मनसेचे माजी गटनेते तथा नगरसेवक सुधाकर चव्हाण यांना बेकायदेशीर विदेशी दारू बाळगल्याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या येऊर येथील बंगल्यातून ६२ बाटल्यांमधील ५२ हजार २०० रुपयांचे विदेशी मद्य जप्त केले.परमार प्रकरणात काँग्रेसचे माजी गटनेते विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नजीब मुल्ला, ठामपाचे तत्कालीन विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे आणि सुधाकर चव्हाण यांना मुंबई उच्च न्यायालयाने २ डिसेंबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र, या प्रकरणाची सुनावणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यानच्या काळात सहायक पोलीस आयुक्त दिलीप गोरे आणि वर्तकनगर पोलिसांच्या विशेष पथकाकडून सोमवारी दिवसभर चव्हाणांच्या येऊर येथील निवासस्थानी झडती घेतली. यात परमार प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांचा शोध घेत असताना एका खोलीत पथकाला वेगवेगळ्या बड्या कंपन्यांच्या विदेशी मद्याचा साठा मिळाला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनीही याप्रकरणी त्यांची चौकशी केली आहे.