Coronavirus: परवानगी मिळूनही नाभिक समाज नाखूशच; पीपीई किटच्या आर्थिक ओझ्यामुळे नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 03:17 AM2020-06-29T03:17:53+5:302020-06-29T03:18:04+5:30

दाढी करण्यासही मुभा देण्याची मागणी

Coronavirus: Nuclear society unhappy with permission; Dissatisfied with the financial burden of the PPE kit | Coronavirus: परवानगी मिळूनही नाभिक समाज नाखूशच; पीपीई किटच्या आर्थिक ओझ्यामुळे नाराजी

Coronavirus: परवानगी मिळूनही नाभिक समाज नाखूशच; पीपीई किटच्या आर्थिक ओझ्यामुळे नाराजी

Next

ठाणे : नाभिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शंभर दिवसांनी का होईना, सामाजिक अंतर आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करीत व्यवसायाची परवानगी मिळाली. रविवारी, व्यवसायाच्या पहिल्याच दिवशी ठाण्यात कही खुशी कही गमचे वातावरण होते. काहींनी परप्रांतीय कारागिरांअभावी, तर काहींनी कोरोनाचे सावट गडद असल्यामुळे रविवार असूनही पहिल्या दिवशी दुकाने सुरु केलीच नाही. बहुतांश ठिकाणी नियमांचे पालन करीत व्यवसायाला सुरुवात केल्याने त्यांच्यात खुशीचे वातावरण होते.

लोकमान्यनगर, सावरकरनगर, वागळे इस्टेट आणि किसननगर या कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या भागांमधील व्यावसायिकांना त्यांच्या कुटूंबियांनीच दुकाने उघडण्यासाठी विरोध केला. शिवाईनगर येथील फ्रेडस् सलूनचे शाम मन्नतकर यांनी शासनाने सशर्त परवानगी दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांच्याकडे फोन करुनच गिºहाईकांना केस कर्तनासाठी जावे लागते. गिºहाईकाचे तापमान तपासणी करणारी यंत्रणा घेण्यासाठी तीन हजार मोजावे लागणार आहेत. ती यंत्रणाही ते लवकरच घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाचशे रुपयांचे पीपीई किट आणि एकदाच वापरात येणारे अंगावरचे अ‍ॅप्रन या सर्व खर्चिक बाबी असल्यामुळे नाईलाजास्तव ८० ऐवजी १०० रुपये केस कर्तनासाठी आकारावे लागणार असल्याचे ते म्हणाले. कोरोनामुळे गिºहाईकांमध्येही भीती आहे. त्यात दाढीला परवानगी नाही. यापुढे दुकानाचे १८ हजारांचे भाडे कसे भरायचे, अशी चिंता त्यांना सतावत आहे. याच दुकानात कटिंगसाठी तब्बल तीन महिन्यांनी आलेल्या रोहित चव्हाण यांनी दुकाने पुन्हा सुरु झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पीपीई किटसाठी या व्यावसायिकांना सरकारने ५० टक्के सवलत किंवा त्यासाठी अनुदान दिले पाहिजे, असेही ते म्हणाले. दरवाढीचेही त्यांनी समर्थन केले.

यशोधननगर येथील अजित आणि परमेश शर्मा या पितापुत्रानेही सॅनिटायझेशन करुन व्यवसाय करण्यावर भर दिला आहे. रविवारी सकाळी ९ वाजता त्यांनी दुकान सुरु केले. त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण अनेकांनी त्यांच्याकडे दाढी करण्यासाठी आग्रह धरला. मात्र, दोन हजारांचा दंड भरावा लागणार असल्यामुळे त्यांनी दाढीला विरोध केल्याचे अजित शर्मा यांनी सांगितले. ६० टक्के लोक घरीच दाढी करतात. पण व्यावसायिकांना परवानगी मिळली तरच दाढीही करु, असेही शर्मा म्हणाले. पीपीई किट वगळता सर्व प्रकारची खबरदारी शर्मा यांनी घेतली होती. गिºहाईकांच्या नोंदीही ठेवत असल्याचे ते म्हणाले.

शासनाने पीपीई किटच्या किमती कमी कराव्यात. केस कर्तनाला परवानगी मिळाल्याने आपलीही स्वच्छता राहणार आहे. - तानाजी साळुंखे, रहिवासी, यशोधननगर, ठाणे

केस घरी कापू शकत नाही. दाढीही तितकी जमत नाही. त्यामुळे शासनाने लवकरच दाढीलाही परवानगी द्यावी -भरत गरुडे, कर्मचारी, लोकमान्यनगर पाडा क्रमांक तीन, ठाणे

दाढीला परवानगी नाही, हे योग्यच आहे. तीन महिन्यात स्वत:ची कटिंग करण्याचा प्रयत्न केला. पण जमलेच नाही. अपॉइटमेंट घेऊनच कटिंगसाठी आलो. - स्वराज गदरी, विमा अधिकारी, लक्ष्मीपार्क, ठाणे

कामापेक्षा निर्जंतुकीकरण करण्यात जातोय वेळ
कामापेक्षा निर्जंतुकीकरणातच अधिक वेळ जात असल्याची तक्रार लोकमान्यनगर पाडा क्रमांक दोन येथील राजकमल हेअर ड्रेसर्सचे मालक पुरुषत्तोम खरे यांनी केली. पीपीई किट घालून काम करणे अवघड आहे. यापुढे केस कर्तन करण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही कमी होणार आहे. पी१ पी२ यामुळेही आठवड्यातून केवळ तीन दिवस व्यवसायासाठी मिळणार आहेत. एरव्ही, रविवार म्हटल्यावर दुकानात गर्दी असते. आता साडेतीन महिन्यांनी दुकान उघडूनही गिºहाईक नाहीत. गेली तीन महिने दुकान बंद होते. पीपीई किटसह अनेक स्वच्छतेच्या वस्तू घ्यायलाही पैसे नव्हते. सरकारने अनुदान देणे आवश्यक असल्याचेही मत खरे यांनी व्यक्त केले.

अनोळखींना प्रवेश बंदी
दुकानात अनोळखींना प्रवेश बंदी केल्याचे वर्तकनगर येथील व्यावसायिक भूषण वाघ यांनी सांगितले. वाघ यांनी दुकानात सोडियम क्लोराईड, हॅन्ड ग्लोव्हज, कॅप, पीपीई किट, नविन अ‍ॅप्रन अशी सर्व सामुग्री ठेवून नियमांचेही काटेकोर पालन केले. त्यांंनी कटिंगसाठी ७० ऐवजी १५० रुपये आकारले आहेत. नाभिक समाजाला सरकारने आर्थिक मदत केली पाहिजे. पहिल्याच दिवशी प्रतिसाद चांगला मिळाला. पण लोकांमध्ये अजून भीती असल्याचेही ते म्हणाले.

कारागिरांना पीपीई कीट योग्यच आहे. परंतु, ते कपड्याचे मिळाल्यास वापरणे सोपे जाईल. अर्ध्या तासात एका गिºहाईकाची कटिंग करणे अवघड जाते, असे ठाणे शहर संत सेना पुरोगामी नाभिक संघाचे सचिव अरविंद माने म्हणाले. दाढी करण्यालाही गिºहाईकांची मागणी असल्यामुळे त्यालाही परवानगी द्यावी, अशी मागणी माने यांनी केली आहे.

रविवार, २८ जूनपासून नाभिक व्यावसायिकांना परवानगी मिळाली. सुटीचा दिवस असल्याने रविवारी चाकरमानी गर्दी करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अनेकांसाठी तो भ्रमनिरास ठरला. अनेकांचे परप्रांतीय कारागीरच गावी गेल्यामुळे त्यांची पंचाईत झाली. नौपाड्यासारख्या अनेक भागांमध्ये पी१ आणि पी२ या नियमांमुळे काही व्यावसायिक कात्रीत सापडले. त्यामुळे इच्छा असूनही अनेकांना पहिल्याच दिवशी दुकान उघडता आले नाही.

ज्यांनी दुकाने सुरु केली, त्यांचा बहुतांश वेळ पीपीई किट परिधान करणे, सॅनिटायझेशन करणे, हातामध्ये ग्लोव्हज घालणे, स्वत:बरोबरच गिºहाइकांनाही मास्कसाठी सक्ती करणे यामध्ये गेला. केवळ केस कर्तनाची परवानगी आहे, दाढीसाठी नाही. ती केली तर दोन हजारांचा दंड आहे.

Web Title: Coronavirus: Nuclear society unhappy with permission; Dissatisfied with the financial burden of the PPE kit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.