CoronaVirus News: ठाण्यात आज 2027 कोरोनाबाधितांची नोंद; 46 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 08:29 PM2020-07-03T20:29:06+5:302020-07-03T20:41:53+5:30

कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात सर्वाधिक 564 रुग्णांसह तिघांच्या जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

CoronaVirus News: 2027 corona victims registered in Thane today; 46 killed | CoronaVirus News: ठाण्यात आज 2027 कोरोनाबाधितांची नोंद; 46 जणांचा मृत्यू

CoronaVirus News: ठाण्यात आज 2027 कोरोनाबाधितांची नोंद; 46 जणांचा मृत्यू

Next

ठाणे: ठाणे जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. त्यात शुक्रवारी जिल्ह्यात दिवसभरात बाधितरुग्णांची संख्या 2 हजार 27 तर, 46 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 38 हजार 594 तर, मृतांची संख्या 1 हजार 176 झाली आहे. या वाढत्या बाधितांच्या संख्येसह वाढत्या मृतांच्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागावरील ताण वाढत आहे.

शुक्रवारी कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात सर्वाधिक 564 रुग्णांसह तिघांच्या जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 8 हजार 49 तर, मृतांची संख्या 130 इतकी झाली आहे. ठाणे महानगर पालिका हद्दीत 420 बाधितांची तर, 17 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या 9 हजार 950 तर, मृतांची संख्या 369 वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत 257 रुग्णांची तर, आठ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 7 हजार 602  तर, मृतांची संख्या 232 वर पोहोचला आहे.

भिवंडी महापालिका क्षेत्रात 62 बधीतांसह 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या 2 हजार 173 तर, मृतांची संख्या 118 वर पोहोचली. त्यात मीरा भाईंदरमध्ये 276 रुग्णांची तर, तिघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 3 हजार 885 तर, मृतांची संख्या 152 इतकी झाली आहे. उल्हासनगर 191 रुग्णांची तर, दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 2 हजार 347 तर,मृतांची संख्या 49 झाली आहे. अंबरनाथमध्ये 101 रुग्णांची तर, पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 2 हजार 32 तर, मृतांची संख्या 57 झाली आहे. बदलापूरमध्ये 48 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 906 झाली आहे. तर, ठाणे ग्रामीण भागात 108 रुग्णांची तर, चौघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एक हजार 907 तर, मृतांची संख्या 54  वर गेली आहे.

Web Title: CoronaVirus News: 2027 corona victims registered in Thane today; 46 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.