शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
4
"भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
5
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
6
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
7
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
8
"वडील गेल्यापासून आई गेली १२ वर्ष...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक
9
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
10
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
11
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
12
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
13
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
14
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
15
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
16
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
17
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
19
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
20
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

CoronaVirus: 'त्या' वादग्रस्त लग्नातील हजेरीनंतर कल्याण डोंबिवलीच्या महापौर होम क्वॉरेंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 11:43 PM

पुढील 14 दिवस घरीच राहणार; लग्नातील उपस्थिती ठरली होती वादग्रस्त

कल्याण डोंबिवलीच्या महापौर विनीता राणे या होम क्वॉरेंटाईन झालेल्या आहेत. त्यांनी डोंबिवलीत पार पडलेल्या वादग्रस्त लग्नात हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांनी स्वत:हून होम क्वॉरेंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. 14 दिवस त्या घरीच राहणार आहेत.महापौर राणे या जुनी डोंबिवली परिसरातील नेमाडे गल्ली परिसरात राहतात. या परिसरात पार पडलेल्या लग्न सोहळ्याला त्या उपस्थित होत्या. त्यांनी स्वत:ची काळजी घेतली होती. तरीदेखील खबरदारीचा उपाय म्हणून राणे यांनी स्वत:ला होम क्वॉरेंटाईन केले आहे. या वृत्ताला त्यांचे पती व शिवसेना नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी दुजोरा दिला आहे.विनिता राणे उपस्थित राहिलेल्या लग्न सभारंभात परदेशातून आलेला तरुण सहभागी झाला होता. कोरोना असताना त्याने सहभाग घेतला असा मेसज त्याने टाकला होता. हे लग्न काँग्रेसशी संबंधित एका माजी पदाधिकारी महिलेच्या नातेवाईकाचे होते. त्याच लग्नात महापौरांनी हजेरी लावली. लग्न त्यांच्या परिसरात जुनी डोंबिवलीत असल्याने जाणे भाग होते असे राणे यांच्याकडून सांगण्यात आले. या लग्नाचा व हळदीचा विषय वादग्रस्त ठरल्याने काळजी घेण्यासाठी महापौर होम क्वारंटाइन झालेल्या आहे.दरम्यान महापौरांनी अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरीकांनी गर्दी करु नये यासाठी रस्त्यावर उतरुन नागरिकांना आवाहन केले. मात्र त्यांचीच लग्न प्रसंगातील उपस्थिती वादग्रस्त ठरली. या लग्नास केवळ महापौरच नाही अन्य लोकप्रतिनिधीही उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस