शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : ठाण्याच विलगीकरण कक्षाला वाढता विरोध, पालिकेची डोकेदुखी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 01:53 IST

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल असते तर ही वेळ आली असती का, असा सवाल करण्यात येत आहे.

ठाणे : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी श्रीनगरच्या विलगीकरण कक्षाला विरोध झाल्यानंतर कासारवडवली येथील बीएसयूपीच्या इमारतीत तो सुरू करण्यासही स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. आता पोलीस बंदोबस्तात या इमारतीचा ताबा घेतला असला, तरी ते अद्याप सुरू झालेले नाही. मात्र, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल असते तर ही वेळ आली असती का, असा सवाल करण्यात येत आहे. यापूर्वी त्यांनी शहरातील अशक्य असलेली रस्ता रुंदीकरण मोहीम पार पाडली आहे. त्यामुळे ते असते तर प्रत्येक प्रभाग समितीत विलगीकरण कक्ष सुरू झाले असते, असा सूर काढला जात आहे.कासारवडवलीतील बीएसयूपीच्या इमारतीमध्ये हा कक्ष करण्यास नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. एक तर तो सुरू करताना नागरिकांना विश्वासात घेतले नाही. दुसरीकडे ही इमारत कासारवडवली गावाला लागून असल्याने याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असल्याची शंका सिद्धार्थ ओवळेकर यांनी उपस्थित केली आहे. नागरिकांचा रोष बघून त्यांनी प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर यांच्याशीही चर्चा केल्यानंतर अखेर या ठिकाणी कक्ष सुरू करणार नसल्याचे पालिकेने तोंडी आश्वासन दिले. मात्र, लेखी आश्वासनासाठी गावकऱ्यांनी ठाणे महापालिकेला पत्र दिले आहे. त्यानंतर, पोलिसांच्या मदतीने कासारवडवली येथील विलगीकरण कक्षाचा ताबा महापालिकेने घेतला आहे. मात्र, स्थानिकांचा विरोध अद्यापही मावळलेला नाही.यापूर्वी झाला नाही विरोधयापूर्वी महापालिकेने कोणतीही मोहीम हाती घेतली, तरी तिला कधीही विरोध झाल्याचे दिसले नाही. रस्ता रुंदीकरणाची मोहीम असो किंवा फेरीवाल्यांना शिस्त लावण्याचा प्रश्न असो, एकाही ठिकाणी कोणीच विरोध केला नाही. त्यामुळे आज ठाण्याचा चेहरामोहरा बदलला आहे. या मोहिमा यशस्वी झाल्या, त्या केवळ आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यामुळेच. त्यामुळे आता पालिकेतील अधिकारीदेखील जयस्वाल यांची आज खरी गरज असल्याचे बोलत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका