शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: वैऱ्याच्याही नशिबी अशी घालमेल येऊ नये, कोरोना रुग्णाचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 01:37 IST

कोरोना झाल्यामुळे रुग्ण व कुटुंबाची ताटातूट व घालमेल कशी होते, याबाबतचा आलेला अनुभव कोरोनातून बरे झालेल्या डोंबिवलीतील एका ४८ वर्षीय रुग्णाने कथन केला.

- प्रशांत मानेडोंबिवली : कोरोना झाल्यामुळे रुग्ण व कुटुंबाची ताटातूट व घालमेल कशी होते, याबाबतचा आलेला अनुभव कोरोनातून बरे झालेल्या डोंबिवलीतील एका ४८ वर्षीय रुग्णाने कथन केला.ते म्हणाले की, कोरोनाच्या प्रादुर्भावात गरिबांना मदतीचा हात देताना कोरोनाची लागण कशी झाली, हे कळलेच नाही. एक दिवस ताप आला. वयोवृद्ध आईलाही ताप आल्याने लागलीच दोघांनी कोरोनाची चाचणी केली. दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. दोघेही तत्काळ उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल झालो. कोरोनाचा सामना करीत असताना घरातील अन्य व्यक्तींची विशेषकरून अर्धांगवायूच्या आजाराने त्रस्त असलेल्या वयोवृद्ध वडिलांची अधिक काळजी लागून राहिली होती. एरव्ही, आईच त्यांची सेवाशुश्रूषा करायची. परंतु, ती उपचारार्थ रुग्णालयात दाखल झाल्याने त्यांची सेवा कोण करणार, असा यक्षप्रश्न उभा राहिला होता. परंतु, यात माझ्या पत्नीची मोलाची साथ लाभली आणि वडिलांच्या औषधोपचाराची जबाबदारी तिने लीलया पेलली.दरम्यान, कोरोनाच्या चाचणीत ७५ वर्षीय वडील आणि १५ वर्षांचा मुलगा हे दोघेही पॉझिटिव्ह निघाले. सुदैवाने पत्नीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मी आणि आई दोघेही रुग्णालयात होतोच. आता वडिलांना रुग्णालयात कसे दाखल करणार, याबाबत चिंता लागली होती. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह झाल्यावर सहसा त्याच्या संपर्कात आजूबाजूला राहणारे अन्य कोणीही येत नाही. मदत करणे दूरच असते. त्यात, आमचे जवळपास संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे अर्धांगवायूचा आजार असलेल्या वडिलांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करेपर्यंत माझ्या पत्नीला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. आम्ही दोघे ज्या रुग्णालयात दाखल होतो, त्याच ठिकाणी वडिलांना ठेवण्यात आले. आम्हाला प्रत्येकाला वेगवेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. सुदैवाने आम्हाला डॉक्टर आणि परिचारिकांकडून चांगली वागणूक मिळाली.परंतु, वयोवृद्ध आईवडिलांची अधिक चिंता वाटत होती. रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने मुलाला घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्याच्याही तब्येतीची काळजी वाटत होती. पत्नी आणि मुलाच्या संपर्कासाठी मोबाइल हेच एक साधन होते.डॉक्टर आणि परिचारिकांकडे आईवडिलांच्या तब्येतीची विचारपूस करत राहायचो. मी आणि आई उपचारासाठी दाखल झाल्यानंतर दोन दिवसांनी वडील दाखल झाले होते. दहा दिवस झाल्यानंतर आम्हाला दोघांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला....म्हणून वाढला मुक्कामवडिलांना दाखल करून १० दिवस पूर्ण न झाल्याने त्यांना तेथेच राहावे लागणार होते.त्यांच्या काळजीपोटी आम्ही दोघांनी दोन दिवसांचा मुक्काम वाढवला आणि एकत्रितच रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला.कोरोनाची लागण झाल्यानंतर घेतलेला अनुभव वैºयाच्याही नशिबी येऊ नये, हीच प्रार्थना.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdombivaliडोंबिवली