शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus News: ठाण्यात सकाळी ११ वाजताची ‘डेडलाईन’ पाळण्यासाठी व्यापाऱ्यांसह नागरिकांचीही तारेवरची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 21:52 IST

सकाळी ७ ते ११ वाजताची ‘डेडलाईन’ पाळण्यासाठी किराणा माल आणि भाजी विक्रेते यांच्यासह ते खरेदीसाठी जाणाºया नागरिकांचीही तारेवरची कसरत होत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून यामध्ये आणखी किमान दोन तासांची वाढ करुन ती दुपारी १ वाजेपर्यंत करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

ठळक मुद्दे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईचा बडगा ११ ऐवजी दुपारी १ पर्यंत वेळ वाढविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या थोपविण्यासाठी सकाळी ७ ते ११ वाजताची ‘डेडलाईन’ पाळण्यासाठी किराणा माल आणि भाजी विक्रेते यांच्यासह ते खरेदीसाठी जाणाºया नागरिकांचीही तारेवरची कसरत होत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून यामध्ये आणखी किमान दोन तासांची वाढ करुन ती दुपारी १ वाजेपर्यंत करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्याचबरोबर मृत्युचीही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने गेल्या काही दिवसांपासून अधिक कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याचबरोबर गेल्या दोन दिवसांपासून अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त किराणा आणि भाजी विक्रेत्यांना सकाळी ११ पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. या वेळेचे काटेकोर पालन करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि पोलिसांकडून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे सकाळी १०.३० ते ११ वाजेपर्यंत पोलिसांची वाहने ध्वनीक्षेपकावरुन दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत असतात. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून किंवा कारवाईच्या भीतीने ११ पर्यंत ही सर्व दुकाने बंद होतात. परंतू, मासळी तसेच अनेक विक्रेत्यांना सकाळी ९ ते १० पर्यंत माल मुंबईतून आणल्यानंतर विक्रीसाठी अवघा एक ते दोन तासांचा अवधी मिळतो. त्यामुळे या विक्रेत्यांची दमछाक होते. त्याचवेळी ग्राहकांनाही सकाळी ११ नंतर किराणा किंवा भाजी मिळत नसल्यामुळे त्यांनाही गैरसोयीला सामोरे जाावे लागते. त्यामुळे ही वेळ आणखी एक ते दोन तासांनी वाढवून द्यावी, अशी मागणी विक्रेते तसेच ग्राहकांमधून व्यक्त होत आहे.* दरम्यान, नियम न पाळणाºया विक्रेते आणि भाजी विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा पालिका आणि पोलिसांकडून उगारला जात आहे. त्यातच त्यांना सक्तीने कोरोना चाचणीही आवश्यक केल्यामुळे ती करण्यासाठी या व्यापाºयांची मोठी कसरत होत आहे. त्यासाठीही आणखी मुदतवाढ मिळावी, असाही सूर जांभळी नाका आणि वागळे इस्टेट येथील व्यापाºयांनी व्यक्त केला आहे.

सकाळी मासळी किंवा इतर माल खरेदीसाठी पहाटे मुंबईत जावे लागते. ते घेऊन येईपर्यंत सकाळी ९ ते ९.३० होतात. मग विक्रीसाठी मिळणारा अवधी अगदी अल्प आहे. यात वाढ करण्यात यावी.सीमा कोळी, मासळी विक्रेती, ठाणे.

मी अत्यावश्यक सेवेमध्ये काम करीत आहे. रात्री उशिरा रुग्णालयातून आल्यानंतर सकाळी घरातील कामे उरकून पुन्हा रुग्णालयात जाण्याची धावपळ असते. त्यात सकाळी ११ पर्यंतच किराणा आणि भाजी विक्री सुरु असल्यामुळे ती खरेदीसाठी मोठी कसरत होते.एक परिचारिका, ठाणे.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस