उल्हासनगर महापालिका विरोधी पक्षनेते पदी काँग्रेसच्या अंजली साळवे, महापालिका सचिव व भाजपा नगरसेवका तू तू मैं मैं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 00:24 IST2026-04-23T00:23:26+5:302026-04-23T00:24:08+5:30
काँग्रेसच्या नगरसेविका अंजली साळवे यांना महासभेत विरोधी पक्षनेते पदी घोषित केल्याचा राग भाजप नगरसेवकांनी महापालिका सचिव तथा उपायुक्त अनंत जवादवार यांच्यावर धावून गेल्याने, महापालिकेत तणाव निर्माण झाला.

उल्हासनगर महापालिका विरोधी पक्षनेते पदी काँग्रेसच्या अंजली साळवे, महापालिका सचिव व भाजपा नगरसेवका तू तू मैं मैं
उल्हासनगर : महापालिका काँग्रेसच्या एकमेव नगरसेविका अंजली साळवे यांना महासभेत विरोधी पक्षनेते पदी घोषित केल्याचा राग भाजप नगरसेवकांनी महापालिका सचिव तथा उपायुक्त अनंत जवादवार यांच्यावर धावून गेल्याने, महापालिकेत तणाव निर्माण झाला. आयुक्त मनिषा आव्हाळे हे याबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणुकीत एकमेका विरोधात शड्डू ठोकणारे भाजप व शिंदेसेना सत्तेसाठी एकत्र आले. पालिकेच्या ऐकून ७८ पैकी भाजपाचे सर्वाधिक ३७ तर शिंदेसेनेचे ३६ नगरसेवक निवडून आले. वंचित बहुजन पक्षाच्या २ नगरसेवकांनी शिंदेसेनेला पाठिंबा दिला. तर एका अपक्ष नगरसेवक व साई पक्षाचा एकमेव नगरसेवकाने शिंदेसेनेच्या आघाडीत सामाविष्ट झाले. महापालिका सत्तेची ४० जादुई फिगर शिंदेसेनेने वंचित, साई व अपक्ष नगरसेवकाच्या पाठिंब्याने पूर्ण केली. तर काँग्रेसच्या एकमेक नगरसेवक असलेल्या अंजली साळवे यांनी विरोधी पक्षाची भूमिका वठविली. बुधवारच्या महापालिका महासभेत विरोधी पक्ष नेते पदाची घोषणा महापालिका सचिव अनंत जवादवर यांनी जाहीर करून, महापौरांच्या आदेशाने महासभा समाप्त झाल्याचे सांगत राष्ट्रगीत गायण्यास सांगितले.
महापालिका सचिव व उपायुक्त अनंत जवादवर यांनी विरोधी पक्ष नेते पदाची घोषणा करून राष्ट्रगीत गाण्याचे आदेश दिले. यांचा राग भाजपच्या नगरसेवकांना येऊन त्यांनी पालिका सचिव यांना जाब विचारून तू तू मैं मैं झाली. भाजपचे गटनेते राजेश वधारिया यांनी हा राग क्षणिक असल्याचे सांगितले. तर शिंदेसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी भाजप व पालिका सचिव जवादवर यांच्यात वाद झाल्याचे सांगितले. याबाबत महापौर अश्विनी निकम व आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या सोबत संपर्क केला असता झाला नाही. तर महापालिका सचिव तथा उपायुक्त अनंत जवादवर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मोबाईल बंद केला. एकूणच महापालिका सत्तेत असलेले शिंदेसेना व भाजप नगरसेवकातील वाद चव्हाट्यावर आले असून अधिकारी त्यांच्या रागाचे बळी ठरत आहेत.