शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

१०५ कोटींच्या रिंगरूटच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण; भूमिपूजनाचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 00:02 IST

उल्हास नदीवरही नव्या पुलाची उभारणी

बदलापूर : बदलापूर आणि ग्रामीण भागातील विकासकामांचे भूमिपूजन शुक्रवारी झाले. त्यातील बदलापूरमधील महत्त्वाचा रस्ता असलेल्या जान्हवी लॉन ते शिरगाव या १०५ कोटींच्या रिंगरूट रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. सोबत, उल्हास नदीवरील नव्या पुलाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले.

बदलापूरमधील विविध ठिकाणच्या २९ रस्त्यांचे आणि बदलापूर गावाकडे जाणाऱ्या उल्हास नदीवर आठ कोटी रु पये खर्चाच्या नवीन पुलाचे भूमिपूजन खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले. एमएमआरडीएच्या माध्यमातून बदलापूरच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. जुना कात्रप पेट्रोलपंप ते खरवई या १०५ कोटी रुपयांच्या बाह्यवळण रस्त्याचे आणि योगेश्वर हॉटेल ते मोहन हायलॅण्डकडे जाणाºया पाच कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपूजन आणि अन्य रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

एमएमआरडीएच्या माध्यमातून बदलापूरमध्ये विविध विकासकामे झाली आहेत. यामुळे बदलापूरसह मुरबाडमध्ये रस्ते काँक्रिटचे करण्यात येणार असून मतदारसंघात एकही खड्डा दिसणार नाही, अशी ग्वाही कथोरे यांनी दिली. यावेळी नगराध्यक्ष प्रियेश जाधव, शहरप्रमुख वामन म्हात्रे, उपनगराध्यक्षा राजश्री घोरपडे, नगराध्यक्ष रामभाऊ पातकर, भाजप शहराध्यक्ष संभाजी शिंदे, शहरप्रमुख वामन म्हात्रे, नगरसेवक शरद तेली, श्रीधर पाटील, प्रकाश पाटील आदी यावेळी उपस्थित होते.मेट्रोच्या कामालाही मिळणार गतीआमदार किसन कथोरे यांनी भूमिपूजनानंतर मेट्रोच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. बदलापूर मेट्रो थेट मुंबई वेस्टर्नला जोडण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. या मेट्रोचा डीपीआर तयार झाल्यावर त्याची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार असल्याचे कथोरे यांनी यावेळी स्पष्ट केले.