शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी, मग शाळांचे स्थलांतर नाही; महाराष्ट्र सरकारचे नवे धोरण, अटी व अंतरमर्यादा लागू 
2
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
3
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
4
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
5
मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय?
6
उडत्या विमानाचा फोटो काढणे पडले भयंकर महागात! दुबईत भारतीय तरुणाला थेट १० वर्षांचा तुरुंगवास
7
India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी
8
हबिबा फसवणूक प्रकरण : आधी प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवली, नंतर जाळ्यात ओढले, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये फुटले महेशचे बिंग
9
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
10
Mamata Banerjee : "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
11
दिवाळीच्या तोंडावर नोकरीवरून हाकलले; ६ महिन्यांनी त्याच कंपनीने डेटासाठी फोन केला अन्.. 
12
'डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये..."; विद्यार्थिनीकडे संतापजनक मागणी, लखनौ विद्यापीठात खळबळ
13
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
14
‘आनंद’ मरा नहीं, आनंद कभी नहीं मरते...!
15
सिडकोकडील स्थानके मध्य रेल्वेकडे देणार, नवी मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार सुखकर
16
स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
17
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
18
काम पूर्ण होण्याआधीच मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू; खड्डे, सेवारस्ते आणि पुलांची कामे रखडलेलीच
19
पीएम मोदींच्या आवाहनानंतर परकीय चलन साठ्यात प्रचंड वाढ; सरकारी तिजोरीत आले ₹६०,००० कोटी
20
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

रुंदीकरणासाठी आयुक्तांची सहा तास पायपीट

By admin | Updated: March 27, 2016 02:22 IST

कॅडबरी ते पोखरण रस्ता, स्टेशन परिसर, खोपट रस्ता, कापूरबावडी रस्त्याचे रुंदीकरण केल्यानंतर आता टिकुजिनीवाडी, पोखरण रोड नं. १, कापूरबावडी जंक्शन, जांभळीनाका ते स्टेशन

ठाणे : कॅडबरी ते पोखरण रस्ता, स्टेशन परिसर, खोपट रस्ता, कापूरबावडी रस्त्याचे रुंदीकरण केल्यानंतर आता टिकुजिनीवाडी, पोखरण रोड नं. १, कापूरबावडी जंक्शन, जांभळीनाका ते स्टेशन ते गोखले रोड या रस्त्यांच्या रुंदीकरणाचा कार्यक्रम पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हाती घेतला आहे. त्यानुसार, त्यांनी शनिवारी तब्बल सहा तास पायी चालत त्यांची पाहणी करून सोमवारपासून येथील वाढीव अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
सकाळी १० वाजता आयुक्तांनी हॅप्पी व्हॅली ते टिकुजिनीवाडी येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. त्याचे काम कोणत्याही परिस्थितीमध्ये मार्च अखेर पूर्ण करून ७ एप्रिलपासून तो वाहतुकीस खुला करण्याचे आदेश दिले. त्यानंतर, त्यांनी पोखरण रोड नं. १ ची पाहणी करून शास्त्रीनगर ते उपवनपर्यंतच्या उर्वरित पट्ट्यातील वाढीव अनधिकृत बांधकाम सोमवारपासून पाडण्याच्या सूचना दिल्या.
कापूरबावडी जंक्शन येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी करून झाल्यानंतर तेथील रहिवाशांशी संवाद साधून रुंदीकरण मोहिमेमुळे त्यांच्यावर कसलाही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही दिली.
या वेळी त्यांनी जांभळीनाका ते सुभाष पथ ते स्टेशन रोडमार्गे गोखले रोड या परिसराची पाहणी केली. रस्ता रुंदीकरणानंतरही ज्या व्यावसायिकांनी रोड लाइनच्या बाहेर परत दुकाने थाटली होती, त्यांच्यावर कारवाई करून त्यांचा माल जप्त केला.
या पाहणी दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रतन अवसरमोल, अतिरिक्त नगर अभियंता अनिल पाटील, उपनगर अभियंता राजन खांडपेकर, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, नितीन पवार, हातिम अली, सहायक आयुक्त मारुती गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते.

कल्पतरूजवळ उभारणार निसर्ग उद्यान
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ कल्पतरू गृहसंकुलाजवळ महापालिकेस प्राप्त झालेल्या सुविधा भूखंडावर निसर्ग उद्यान निर्माण करण्याचे आदेश त्यांनी उद्यान विभागास दिले. एकूण क्षेत्रफळ ४५१९.७४ चौरस मीटर असलेल्या या भूखंडावर सद्य:स्थितीत असलेली झाडे तशीच ठेवून त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच स्टार मॉलच्या समोर असलेल्या तलावाच्या सुशोभीकरणाचेही आदेश दिले.