शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांनी नमविले कोकाकोलाला

By admin | Updated: November 16, 2016 04:14 IST

या तालुक्यातील कुडूस या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कोका कोला या कंपनीत लागणारी वाहने यापुढे स्थानिकांची वापरली जातील, बाहेरच्यांची कंत्राटे रद्द केली

वाडा : या तालुक्यातील कुडूस या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कोका कोला या कंपनीत लागणारी वाहने यापुढे स्थानिकांची वापरली जातील, बाहेरच्यांची कंत्राटे रद्द केली जातील हे आज कंपनीला मान्य करावे लागले. याबाबत कुडूस ग्रामपंचायतीचे सदस्य डॉ. गिरीश चौधरी यांनी आवाज उठवून स्थानिकांना वाहतूक ठेका देण्याची मागणी केली. तरूणांनी कंपनीचे प्रवेशद्वार अडविताच प्रशासन खडबडून जागे झाले. व स्थानिकांना वाहतूक ठेका देण्याचे मान्य केले. या निर्णयाने बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या कंपनीत शितपेयांचे उत्पादन केले जाते. त्याच्या कच्चा व पक्क्या मालाची वाहतूक करण्यासाठी दररोज सव्वाशे ते दीडशे टेम्पो व ट्रक लागतात. या वाहतूकीचा ठेका हा बाहेरील चौदा ठेकेदारांना देण्यात आला असून ते स्थानिक वाहने घेत नाहीत. परिणामी त्यांना रोजगार मिळत नाही. स्थानिक बेरोजगार तरूणांची व्यथा स्वाभिमान संघटना वाहतूक सेनेचे वाडा तालुकाध्यक्ष रूकसाद शेख यांनी कुडूस ग्रामपंचायतीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश चौधरी यांना सांगितली. चौधरी यांनी लगेचच या बाबत कंपनीशी पत्रव्यवहार केला. स्थानिकांना वाहतूकीचा ठेका देण्याची मागणी केली. तिच्याकडे कंपनीने दुर्लक्ष केले. त्यानंतर गिरीश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तरूणांनी गेल्या काही दिवसां पूर्वी कंपनीचे प्रवेशद्वार अडवून बाहेरील वाहने घेण्यास मज्जाव केल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले. आणि त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून स्थानिक वाहने घेण्यास सुरुवात केली. डिसेंबरनंतर वाहतूक ठेका स्थानिकांना देऊ, असे आश्वासन दिले गेले. (प्रतिनिधी)