शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
2
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
3
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
4
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
5
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
6
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
7
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
8
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
9
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
10
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
12
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
13
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
14
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
15
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
16
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
17
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
Daily Top 2Weekly Top 5

युती सरकारने मेट्रो ७ मधून शहराला वगळले

By admin | Updated: October 21, 2015 03:09 IST

मेट्रो ७ प्रकल्पात मीरा-भार्इंदर शहराचाही समावेश व्हावा, यासाठी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे २००६ मध्ये पत्रव्यवहार केला होता. त्यावेळी एएमआरडीएच्या कृती

भार्इंदर : मेट्रो ७ प्रकल्पात मीरा-भार्इंदर शहराचाही समावेश व्हावा, यासाठी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे २००६ मध्ये पत्रव्यवहार केला होता. त्यावेळी एएमआरडीएच्या कृती आराखड्यात शहराचा समावेश केला असतानाही २०१७ मध्ये होणाऱ्या पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन युती सरकारने त्यातून शहराला वगळल्याचा आरोप मीरा-भार्इंदर शहर जिल्हा कमिटीने मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
यावेळी आ. मुझफ्फर हुसेन, शहराचे प्रभारी भालचंद्र निकुंभ, जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, गटनेता जुबेर इनामदार, माजी विरोधी पक्ष नेता प्रमोद सामंत, माजी नगरसेवक मिलन म्हात्रे, माजी जिल्हा युवाध्यक्ष राजू शेवंते आदी उपस्थित होते. सध्या बाहेरुन शहरात स्थायिक होण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली असुन लोकसंख्या सुमारे १२ लाखांवर गेली आहे. यापैकी सुमारे ६० टक्के लोकं मुंबईसह आसपासच्या शहरात कामधंद्यासाठी दररोज प्रवास करीत असतानाही येथील वाहतूक व्यवस्था तोकडी पडत आहे. त्यामुळे शहराचा मेट्रो ७ मध्ये समावेश करणे अपरिहार्य असताना पक्षपाती करणाऱ्या युती सरकारने त्याकडे दुर्लक्ष करुन येथील प्रवाशांना फसवले आहे.
प्रशासन राजकीय दबावापोटी २४ आॅक्टोबरपासून २५ नवीन बससह सेवा सुरुळीत होणार असल्याच्या वल्गना करीत आहे.
परंतु, प्रशासनाकडे अद्याप कोणताही कृती आराखडा नाही. त्यामुळे प्रवाशांचा उद्रेक होण्याची शक्यता आ. मुझफ्फर हुसेन यांनी व्यक्त केली आहे. नवीन बस सेवेत दाखल झाल्यास उत्तन मार्गावर ३२१ फेऱ्या दररोज सुरु व्हाव्यात, अशी मागणी केली आहे.
केंद्र व राज्य शासनाने ५० टक्के निधी बस खरेदीसह सल्लागार कंपनीला दिला असताना तो गेला कुठे? असा सवाल करून काँग्रेसने समस्यांचे निवेदन प्रशासनाला दिले. यावर येत्या तीन दिवसांत प्रशासन उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)