एक्सप्रेसचे इंजिन बंद पडल्याने मध्य रेल्वे विस्कळीत

By Admin | Updated: January 13, 2016 11:24 IST2016-01-13T09:12:10+5:302016-01-13T11:24:44+5:30

दिवा रेल्वे स्थानकाजवळ उद्योगनगरी एक्सप्रेस गाडीचे इंजिन बंद पडल्यामुळे मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Central Railway disrupted due to the shutdown of the Express Engine | एक्सप्रेसचे इंजिन बंद पडल्याने मध्य रेल्वे विस्कळीत

एक्सप्रेसचे इंजिन बंद पडल्याने मध्य रेल्वे विस्कळीत

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १३ - दिवा रेल्वे स्थानकाजवळ उद्योगनगरी एक्सप्रेस गाडीचे इंजिन बंद पडल्यामुळे मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे जलद मार्गावरील मुंबई सीएसटीच्या दिशेने येणा-या गाडया काही मिनिटे उशिराने धावत आहेत. 
ऐन कामावर निघण्याच्यावेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने नोकरदार प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील या बिघाडामुळे नोकरदार प्रवाशांना नियोजित वेळेत कार्यालय गाठताना अनंत अडचणींचा सामना करावा लागणार असून, कदाचित आज लेटमार्क लागण्याची शक्यता आहे. काल मंगळवारी हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले होते. 

Web Title: Central Railway disrupted due to the shutdown of the Express Engine