शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल; ठाकरेंवरील हल्ल्याची फित केली व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 07:04 IST

जाधव यांच्यासह नऊ जणांविरुद्ध तक्रारीनंतर नाैपाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्यात भगवा सप्ताह कार्यक्रमात मार्गदर्शनासाठी आलेले माजी मुख्यमंत्री तथा उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आले असताना त्यांच्या वाहनावर मनसेच्या ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह इतरांनी हल्ला केला होता. याचेच समर्थन करण्यासाठी साेशल मीडियाद्वारे घटनेचा लाइव्ह व्हिडीओ केल्याप्रकरणी जाधव यांच्यासह नऊ जणांविरुद्ध शिवसेनेच्या वागळे इस्टेट विभागप्रमुख  प्रतीक राणे यांच्या तक्रारीनंतर नाैपाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाकरे १० ऑगस्टला गडकरी रंगायतन येथे कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्याविरुद्ध मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यांच्या वाहनावर हल्ला केल्याचा एक गुन्हा जाधव यांच्यासह ३५ जणांविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. तसेच फेसबुकवर लाइव्ह व्हिडीओद्वारे हल्ल्याचे समर्थन केले. 

हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप

यावेळी नितीन कंपनी जंक्शन येथून  ठाणे पालिकेकडे जाणाऱ्या अल्मेडा रोडवर ठाकरे यांच्या वाहनांच्या ताफ्यावर नारळ फेकून हल्ल्याचा पूर्व नियोजित कट रचून, त्यास जाधव यांनी प्रोत्साहन देत जमाव एकत्र केला. याच जमावाने त्यांच्या वाहनावर नारळ फेकून वाहनाचे नुकसान केले. हा संपूर्ण प्रकार चित्रित करून तो लाइव्ह दाखवून या घटनेचे समर्थन केल्याने  राणे यांनी अविनाश जाधव, प्रीतेश मोरे, आकाश पवार, अरुण जेटलू आणि मनोज चव्हाण आणि इतर चार अशा नऊजणांवर याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ६१ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Avinash Jadhavअविनाश जाधवUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliceपोलिस