शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाड धर्मनिरपेक्ष असल्यामुळेच प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 00:17 IST

कन्हैय्या कुमारांचा दावा : साधला विद्यार्थ्यांशी संवाद

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जितेंद्र आव्हाड यांना पाठिंबा देण्यासाठी येथे आलो आहे. कारण, ते जातीयवाद व फॅसिझमविरोधातील आपल्या लढ्यावर तसेच पुरोगामी विचारधारेवर ठाम आहेत. मला विश्वास आहे की, ते आपल्या विचारधारेशी प्रतारणा करून भाजपमध्ये अजिबात जाणार नाहीत, म्हणूनच मी त्यांच्या प्रचारासाठी आलो आहे, असे उद्गार फॅसिझमविरोधी विचारधारेतील विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमार यांनी काढले.

मुंब्रा-कौसा येथील ए.ई. काळसेकर डिग्री कॉलेज, एम.एस. कॉलेज आॅफ आर्ट्स, सायन्स अ‍ॅण्ड बीएमएस, सिम्बायोसिस कॉलेज येथे कन्हैय्या कुमार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शानू पठाण, शमीम खान आदी मान्यवर उपस्थित होते. आव्हाड सेक्युलर विचारधारेवर ठाम आहेत. पक्ष जरी कधी कम्युनल झाला, तरी ते पक्षाविरोधात जाण्याची त्यांची हिम्मत आहे. ते कधीच ईडी, सीबीआयच्या नोटीसला घाबरत नाहीत. मृत्यूला घाबरत नाहीत. त्यांना आरएसएस, मोदींना हरवायचे आहे. जातीयवादी-धर्मांध विचारधारेचा पराभव करण्याची इच्छाशक्ती आव्हाड यांच्यात आहे. त्यांच्या या वैचारिक हिमतीला दाद देण्यासाठी मी येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

आझादीचा तराणा सादरयावेळी कन्हैय्या कुमार यांनी आझादीचा तराणा गायला. त्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. कन्हैय्या कुमार व जितेंद्र आव्हाड यांचे जोरदार स्वागत विद्यार्थ्यांनी केले. त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी स्पर्धा लागली होती.

टॅग्स :mumbra-kalwa-acमुंब्रा कळवाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kanhaiya kumarकन्हैय्या कुमार