विवस्त्र सेल्फी दिला नाही म्हणून लग्न मोडले

By Admin | Updated: August 20, 2015 00:50 IST2015-08-20T00:50:53+5:302015-08-20T00:50:53+5:30

भावी वधूने विवस्त्र सेल्फी पाठविला नाही, म्हणून हुंड्याची मागणी करून लग्न मोडल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडला

Break the wedding as the bastard did not give selfie | विवस्त्र सेल्फी दिला नाही म्हणून लग्न मोडले

विवस्त्र सेल्फी दिला नाही म्हणून लग्न मोडले

कल्याण : भावी वधूने विवस्त्र सेल्फी पाठविला नाही, म्हणून हुंड्याची मागणी करून लग्न मोडल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडला. असे करणाऱ्या भावी वरासह त्याच्या अन्य नातेवाइकांविरोधात मुलीने तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार ही कल्याण पश्चिम भागात राहणारी आहे. तिचे ठाण्यातील तरुणाशी लग्न ठरले होते. या दोघांचा जून महिन्यात साखरपुडा झाला होता. दरम्यान, भावी वराने तिच्या मोबाइलवर विनाकपड्याचा सेल्फी पाठव, असा मेसेज पाठविला. या अनपेक्षित मेसेजने तिला धक्का बसला. त्याच्या मागणीला तिने स्पष्ट नकार दिला.
यावरून त्या दोघांमध्ये
भांडण झाले. तसेच नवीन घर घेण्यासाठी २ ते ३ लाख द्यावे लागतील, अशी मागणी त्याने लावून धरली. यात त्याला त्याच्या घरच्यांचीही साथ लाभली.
या मागण्या पूर्ण न केल्याने
ठरलेले लग्न मोडले. या फसवणुकीप्रकरणी एमएफसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिने तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Break the wedding as the bastard did not give selfie