शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पीएमसी बँकेच्या खातेधारकांचा मुख्यमंत्र्यांना घेराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 22:34 IST

ठाण्यात महायुतीच्या जाहीर सभेसाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सभा झाल्यानंतर पीएमसी बँकेच्या खातेदारांनी घेराव घातला.

ठाणे: ठाण्यात महायुतीच्या जाहीर सभेसाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सभा झाल्यानंतर पीएमसी बँकेच्या खातेदारांनी घेराव घातला. भावुक झालेल्या खातेदारांनी आमचे पैसे मिळणार का नाही?, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आता निवडणूक असल्याने सध्या काहीही करता येणार नाही, मात्र ज्या दिवशी निवडणूक संपेल त्याच्या दुसऱ्या दिवशी या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालणार असून, यासंदर्भात निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी खातेदारांना सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांचा आश्वासनानंतर काही प्रमाणात खातेदारांना दिलासा मिळाला आहे.

रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर घातलेल्या निर्बंधानंतर सर्वच खातेदार हवालदिल झाले असून, ठाण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांनाच खातेदारांचा सामना करावा लागला. पालिका मुख्यालयाच्या बाहेर मुख्यमंत्र्यांचे जाहीर भाषण झाल्यानंतर काही खातेदारांनी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाच्या आतमध्ये पीएमसी बँकेच्या विरोधात पोस्टरबाजी केली तसेच बँकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री भाषण संपवून निघत असतानाच खातेदारांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुख्यमंत्री या सर्व खातेदारांचे म्हणणे एकूण घेण्यासाठी स्वतः खातेदारांकडे गेले. त्यानंतर त्यांनी स्वतः सर्व खातेदारांचे म्हणणे एकूण घेतले. यावेळी कोणाचेही नुकसान होणार नाही असे, आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री निघून घेल्यानंतर माजी खासदार किरीट सोमय्या याना खातेदारांना घेराव घातला आणि त्यांनी याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली. किरीट सोमय्या यांनी देखील यासंदर्भात तपास वेगाने सुरु असून विशेष ऑडिट रिपोर्ट आल्यानंतर तपासाला आणखी वेग येणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले . 

पालिकेच्या सुरक्षेची ऐशीतैशी पीएमसी बँकेच्या खातेदारांनी थेट पालिका मुख्यालयाच्या आतमध्येचे आंदोलन करून बँकेच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने पालिकेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे . एरवी होणारी आंदोलने ही पालिका मुख्यालयापासून काही अंतरावर होत असतात. मात्र मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा पालिका मुख्यालयाला लागून असताना या सर्व आंदोलक खातेदारांना पालिका मुख्यालयात प्रवेश कोणी दिला, असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस