शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा उंट सचिवांच्या दालनात

By admin | Updated: November 17, 2016 06:53 IST

बेटकुळ्या फुगलेल्या या पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दालनावर कब्जा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत जेमतेम नऊ जागा असलेल्या भाजपाचे ४३ नगरसेवक विजयी झाल्याने बेटकुळ्या फुगलेल्या या पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दालनावर कब्जा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याखेरीज, महापालिका सचिवांच्या कार्यालयातही हातपाय पसरल्यामुळे सचिवांना आपले अ‍ॅण्टीचेंबर कर्मचाऱ्यांना बसण्याकरिता उपलब्ध करून द्यावे लागले आहे.महापालिका निवडणुकीत मागीलवेळी आपली २७ जागांची ताकद दाखवणाऱ्या मनसेला भाजपाने यावेळी निवडणुकीत जोरदार फटका दिल्याने या पक्षाची प्रकृती नऊ जागांची तोळामासा झाली. राजकीय रणांगणात मनसेला धोबीपछाड दिलेल्या भाजपाने मनसेच्या दालनावर कब्जा केला. कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचे ५३, भाजपाचे ४३ सदस्य आहेत. त्याखालोखाल मनसेचे ९, काँग्रेसचे ४, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे २ सदस्य आहेत. शिवसेनेने आपले तळमजल्यावरील दालन संख्याबळाच्या ताकदीनुसार राखले आहे. भाजपाचे दालन हे पहिल्या मजल्यावर होते. मात्र, आता भाजपाने पहिल्या मजल्यावरील मनसेच्या प्रशस्त दालनाची मागणी केली असून त्याच्या शेजारील सचिव कार्यालयाची काही जागादेखील मागितली. भाजपाने तळमजल्यावरील काँग्रेसचे प्रशस्त दालन वापरावे, असा निर्णय महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत झाला होता. परंतु, पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा तळमजल्यावरील ‘शेजार’ नको असल्याने की काय, भाजपाने पहिल्या मजल्यावरील मनसे कार्यालयाचा हट्ट कायम ठेवला. अखेर, त्यांची मागणी मान्य करण्यात आली असून दालनाचे काम सुरू करण्यात आले आहे. या रस्सीखेचीमध्ये प्रकृती रोडावलेली असतानाही मनसेला तळमजल्यावरील काँग्रेसच्या दालनात हलवण्यात आले आहे. काँग्रेसला राष्ट्रवादीचे दालन उपलब्ध करून दिले आहे. या भानगडीत राष्ट्रवादी सध्या ‘बेघर’ झाली आहे. राजकीय पक्ष आपल्याकरिता कार्यालयाच्या जागा मिळवतील, यात वाद नाही. मात्र, जागा कमी झाल्याने सचिव कार्यालय कर्मचाऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अखेर, काही कर्मचाऱ्यांना सचिवांच्या अ‍ॅण्टीचेंबरचा दालन म्हणून वापर करावा लागला आहे. महापालिकेच्या कारभारात सचिव कार्यालयाचे अनन्यसाधारण महत्त्व असून त्याच कार्यालयाच्या नशिबी अंग चोरून वावरण्याचे भोग आले आहेत. (प्रतिनिधी)