शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
7
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
8
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
10
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
11
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
12
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
13
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
14
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
15
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
16
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
17
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
18
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
19
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
20
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात भाजपाला फटका?

By admin | Updated: October 21, 2016 04:26 IST

उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती झाली नाही, तर त्याचा सर्वाधिक फटका भाजपालाच बसणार आहे. विधानसभा निवडणुकीत मोदीलाटेवर स्वार

- सदानंद नाईक,  उल्हासनगरउल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती झाली नाही, तर त्याचा सर्वाधिक फटका भाजपालाच बसणार आहे. विधानसभा निवडणुकीत मोदीलाटेवर स्वार झालेल्या भाजपाने शिवसेनेपेक्षा जास्त मते घेतली असली तरी आता ती लाट ओसरली आहे. त्यामुळे कोणाच्या मदतीशिवाय पक्षाला यश मिळणे कठीण आहे.सिंधी परिसरात भाजपा, तर मराठी परिसरात शिवसेनेचे वर्चस्व असून ओमी कलानी यांचे येथील राजकारणावर वर्चस्व आहे. येथील निवडणुकीत सिंधी-बिगरसिंधी वाद नेहमीच रंगतो. सिंधी समाजाच्या मतांवर कलानी, भाजपा व स्थानिक साई पक्षाची भिस्त आहे, तर बिगरसिंधी मतांवर शिवसेना, रिपाइं यांची भिस्त आहे. शिवसेना-भाजपा व रिपाइंची गेल्या पालिका निवडणुकीत महायुती होऊनही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यांना स्थानिक साई-गंगाजल पक्षाच्या पाठिंब्यावर पालिका सत्ता स्थापन करावी लागली. त्या बदल्यात साई पक्षाला महापौरपद द्यावे लागले होते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत उल्हासनगरातून राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांचा अवघ्या १८०० मतांनी विजय झाला आहे. कलानी भाजपात आले नाहीत व शिवसेनेने युती तोडली, तर सर्वाधिक फटका भाजपाला बसेल.