शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

माजी आ. नरेंद्र मेहतांच्या विरोधात भाजपच्याच नगरसेविकेची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 23:39 IST

अत्याचार केल्याचा आरोप : पोलीस महानिरीक्षकांकडे केली तक्रार

मीरा रोड : मीरा भार्इंदरमधील भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या विरोधात भाजपच्याच नगरसेविका निला सोन्स यांनी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांच्याकडे मंगळवारी गंभीर तक्रार केली. मेहतांकडून काही वर्षांपासून आपल्यावर अत्याचार होत असून, मला आणि कुटुंबाच्या जिवाला धोका असल्याचे सोन्स यांनी म्हटले आहे. मेहतांची अनैतिक कामे उघड करण्यासाठी आपण स्टिंग ऑपरेशन करुन ते पक्षश्रेष्ठींना दिल्याचा दावाही सोन्स यांनी केला आहे.मीरा भार्इंदर मनपाच्या महापौर, उपमहापौर पदासाठी एकीकडे भाजप आणि महाविकास आघाडीत चुरस असताना सोमवारी सायंकाळी मेहता यांनी फेसबूकवर पोस्ट टाकून आपण भाजप तसेच राजकारणाला सोडचिठ्ठी देत असल्याचे सांगत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. माझ्या आचरणामुळे भाजपचे नुकसान होत आहे. माझ्यामुळे पक्षाच्या नेत्यांना मान खाली घालावी लागेल, असे काही मी सहन करु शकत नाही, असे मेहतांनी या पोस्टमध्ये म्हटल्याने त्यांनादेखील पुढच्या घटनाक्रमाचा अंदाज आला असल्याची शक्यता आहे. सोन्स यांनी गंभीर आरोप करणारी त्यांची व्हिडीओ क्लिप भाजप नेत्यास दिल्यानंतर तासाभराच्या आत मेहतांनी राजकारण सोडण्याची घोषणा केली होती.महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी खबरदारीचा भाग म्हणून गोव्याला पाठवलेल्या भाजप नगरसेवकांना आणून वरसावे येथील मेहतांच्या सी एन रॉक हॉटेलमध्ये ठेवले होते. सोमवारी सायंकाळी राजकारण सोडण्याची घोषणा करणारे मेहता मंगळवारी मात्र सी एन रॉक हॉटेलमध्ये भाजप नगरसेवकांसह माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत उपस्थित होते. भाजप नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील म्हणाले की, आम्ही नगरसेवकांनी आणि चव्हाणांनी पक्ष सोडू नका, तुमची गरज आहे, असा आग्रह मेहतांकडे धरला होता.मेहता हे भाजपच्या आड अनैतिक व गैरप्रकार करत असल्याचे पक्षाच्या वरिष्ठांना आपण कळवले होते. जनतेने नाकारलेल्या मेहतांना या अनैतिक व गैरकृत्यांमुळे पक्षाने पण नाकारावे, अशी त्यांची मागणी होती. माझी मेहतांशी लढाई ही माझा मान व जिवासाठी आहे. माझ्या व मुलाच्या हक्काची लढाई आहे. यातून प्रत्येक महिला जिचे शोषण झाले तिला ताकद मिळेल असे सोन्स यांनी म्हटले आहे. यासंदर्भात नरेंद्र मेहता यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. परंतु ते प्रतिसाद देत नव्हते.

टॅग्स :BJPभाजपा