शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

Thane: विचित्र अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, दोघे जखमी, ठाण्यातील ब्रम्हांड पातलीपाडा येथील घटना

By जितेंद्र कालेकर | Updated: August 2, 2024 18:11 IST

Thane News: टायर पंक्चर झाल्याने थांबलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार वेगाने आलेल्या टेम्पोने मागून धडक दिली. याचदरम्यान त्या टेम्पोची दुचाकीलाही धडक बसून झालेल्या विचित्र अपघातात बाळकुम येथील रहिवासी वैभव डावखर (२७) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ३.५० वाजण्याच्या सुमारास घडली.

- जितेंद्र कालेकर ठाणे - टायर पंक्चर झाल्याने थांबलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार वेगाने आलेल्या टेम्पोने मागून धडक दिली. याचदरम्यान त्या टेम्पोची दुचाकीलाही धडक बसून झालेल्या विचित्र अपघातात बाळकुम येथील रहिवासी वैभव डावखर (२७) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ३.५० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात टेम्पो चालक धर्मेंद्र यादव (४०) आणि ब्ल्यू डार्ट कंपनीचे सुरक्षारक्षक सुनील बाकरे (३८) असे दोघे जण जखमी झाले आहेत. पंक्चर झालेल्या ट्रकचे मालक हे भिवंडीचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) खासदार बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांचा असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

अमरनाथ यादव हे चालक मातीने भरलेला ट्रक मुंबईतून भिवंडी येथे घेऊन जात होते. हा ट्रक पंक्चर झाल्यामुळे त्यांनी तो ट्रक माजिवाडा, गोल्डन डाइज ब्रिजच्या सुरुवातीला उभा केला. याचदरम्यान, मुंबईकडून वडपे या ठिकाणी भरधाव वेगाने निघालेल्या टेम्पोने त्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. याशिवाय, तिथून दुचाकीवरून घरी निघालेल्या वैभव डावखर यांच्या दुचाकीलाही धडक दिली. या अपघातात डावखर हे गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना तातडीने जवळील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातात टेम्पो चालक यादव आणि त्याच्या सोबत असलेला सुरक्षा रक्षक सुनिल बाकरे असे दोघे जखमी झाले. त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. चालकाच्या डोक्याला आणि पोटाला तर सुरक्षारक्षक याच्या डोक्याला आणि उजव्या पायाला दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी कापूरबावडी पोलिसांसह अग्निशमन दलाचे जवान तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी धाव घेत मदतकार्य राबवले.

अपघातामुळे त्या रस्त्यावर वाहतुक कोंडी झाल्याने अपघातग्रस्त वाहने टोईंग वाहनांच्या सहाय्याने बाजूला करण्यात आली. रस्त्यावर सांडलेल्या आॅईलवर पाण्याचा मारा करून तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Accidentअपघातthaneठाणे