शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील बॅनर, होर्डिंग्जची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:21 IST

महापौर : अनधिकृत होर्डिंग्ज हटविणार 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे :  ठाणे शहराच्या विविध रस्त्यांच्या कडेला, रस्त्याच्या मधोमध, फुटपाथच्या कडेला, शौचालयांवर सध्या होर्डिंग्ज, बॅनरचा विळखा पडला असल्याचा आरोप शुक्रवारी झालेल्या महासभेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी केला. यातील किती अधिकृत आणि किती अनधिकृत आहेत, याची यादी महापालिकेकडे आहे का? असा सवालही सदस्यांनी उपस्थित केला. महापौर नरेश म्हस्के यांनी या संदर्भात चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, शहरातील सर्वच होर्डिंग्ज आणि बॅनरचा अहवाल तयार करून अनधिकृत असलेल्या होर्डिंग्जवर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

शुक्रवारच्या महासभेत शिवसेनेचे नगरसेवक देवराम भोईर यांनी या मुद्याला हात घातला. कोलशेत, कापूरबावडी आदींसह इतर भागात सध्या रस्त्यांची दुर्दशा झाली असून सर्वच ठिकाणी होर्डिंग्ज लावले असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यातील अधिकृत किती आणि अनधिकृत किती, असा सवालही त्यांनी केला. याच मुद्याला धरून कॉंग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनीदेखील या मुद्याला हात घालत वर्तकनगर भागातही अशाच पद्धतीने होर्डिंग्ज लावले असल्याचा आरोप केला. पुण्यात होर्डिंग्ज पडून दुर्घटना घडलेली असताना ठाण्यात अशाच पद्धतीने होर्डिंग्ज पडण्याची वाट प्रशासन बघत आहे का, असा सवाल त्यांनी केला. केवळ एका मर्जीतील ठेकेदारासाठी शहरातील रस्ते, फुटपाथ, शौचालये जाहिरातींसाठी आंदण दिले आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित करून प्रशासनाला अडचणीत आणले.

अहवाल तयार करणार- माळवी राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या विळख्याविरोधात आवाज उठवून यामागे कोणाचा हात आहे, असा सवाल करून अनधिकृत होर्डिंग्ज आणि जाहिरातदारांवर कारवाईची मागणीही केली. महापौर नरेश म्हस्के यांनीही या अशा जाहिरातदारांसाठी महापालिका काम करीत आहे का, शहरातील किती अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग्ज आहेत, याची तत्काळ माहिती देऊन अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचे आदेशही दिले. त्यानुसार, उपायुक्त संदीप माळवी यांनी शहरातील सर्वच होर्डिंग्ज आणि बॅनरची चौकशी करून त्याचा अहवाल तयार करून त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका