शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यप्रयोग रद्द करण्याचा आग्रह कलावंतांना नाही

By admin | Updated: February 4, 2016 02:32 IST

संमेलनादरम्यान कलावंतांनी इतर ठिकाणी होणारे नाटकांचे प्रयोग रद्द करावे, असा आग्रह मी करणार नाही. संमेलनाला त्यांनी उपस्थित राहावे, एवढेच आम्ही सांगू शकतो

प्रज्ञा म्हात्रे,  ठाणेसंमेलनादरम्यान कलावंतांनी इतर ठिकाणी होणारे नाटकांचे प्रयोग रद्द करावे, असा आग्रह मी करणार नाही. संमेलनाला त्यांनी उपस्थित राहावे, एवढेच आम्ही सांगू शकतो, असे स्पष्ट मत अ.भा. मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केले. संमेलनाला नाट्य कलावंत दांडी मारून त्यांचे इतरत्र प्रयोग करत असतात. त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा संमेलनातील नाट्यरसिकांमध्ये असते, यावर मोहन जोशी यांना विचारले असता त्यांनी हे मत व्यक्त केले. दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे होणाऱ्या ९६ व्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलन स्थळांची पाहणी करण्यासाठी बुधवारी ते ठाण्यात आले होते.नाट्यसंमेलनाच्या काळात कोणी आपले कार्यक्रम रद्द करावे, या वृत्तीचा मी नाही. त्यामुळे मला कधीही असे वाटत नाही की, आमचा कार्यक्रम आहे म्हणून इतरांनी त्यांचे कार्यक्रम रद्द करावेत. प्रत्येकाला मत आहे. संमेलनात होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी आयोजकांसोबत एक बैठकही घेण्यात आली. त्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाट्यरंगकर्मींनी संमेलनाला यावे, यासाठी ३०० ते ४०० जणांना आम्ही मेसेज केले आहेत. महत्त्वाच्या व्यक्तींना पत्रदेखील पाठविली आहेत. कार्यक्रमांची अंतिम आखणी झाली, असे म्हणायला हरकत नाही. शनिवारी कार्यक्रमांचे स्वरूप जाहीर होईल, असे जोशी यांनी सांगितले.नाट्यपरिषदेच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष खा. राजन विचारे म्हणाले, सर्व ठाणेकर उत्सुकतेने कामाला लागले आहेत. तारीख निश्चित झाल्यापासून दररोज गडकरी रंगायतनमध्ये बैठक घेत असतो. शहरातील सहा ठिकाणी विविध कार्यक्रम होणार असून दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे मुख्य रंगमंच असणार आहे. संमेलनात नवोदित कलाकारांना वाव दिला जाणार असून त्यांना आपले कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आढावा बैठकीत कार्यक्रमांचे स्वरूप ठरविण्यात आले. या वेळी मोहन जोशी, लता नार्वेकर, खा. राजन विचारे, महापौर संजय मोरे, नरेंद्र बेडेकर, प्रा. प्रदीप ढवळ आदी उपस्थित होते. बैठकीनंतर स्टेडियमची व मासुंदा तलावाची पाहणी करण्यात आली.