शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम तलावात २११२७ श्री मूर्तींसह १३६९ गौरींचे विसर्जन

By admin | Updated: September 23, 2015 04:06 IST

पावसाच्या जोरदार हजेरी लावल्यानंतरही ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण केलेल्या कृत्रीम तलावांमध्ये यावर्षी शहरातील पाच दिवसांच्या तब्बल २१ हजार १२७ गणेश मूर्तींसह १ हजार ३६९ गौरीचे विसर्जन झाले.

ठाणे : पावसाच्या जोरदार हजेरी लावल्यानंतरही ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण केलेल्या कृत्रीम तलावांमध्ये यावर्षी शहरातील पाच दिवसांच्या तब्बल २१ हजार १२७ गणेश मूर्तींसह १ हजार ३६९ गौरीचे विसर्जन झाले. तर महापालिकेच्या गणेशमूर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण ४०३ गणेश मूर्तींचे व २ गौरीचे महापालिकेच्यावतीने विधीवत विसर्जन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ठाणे महानगरपालिकेने शहरात दीड दिवस, पाच दिवस आणि १० व्या दिवशी सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेतंर्गत रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन नीळकंठ ग्रीन (टिकुजिनी वाडी) येथे कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. तर पारिसक रेती बंदर आणि कोलशेत बंदर येथे विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था केली आहे. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावरही गणेश मूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे.पाचव्या दिवशी मासुंदा तलावामध्ये २ हजार ५३० श्री गणेशमूर्ती व ७२ गौरींचे विसर्जन करण्यात आले. तर रायलादेवी येथील दोन कृत्रीम तलावामध्ये ३ हजार ७८१ गणेश मूर्ती व ९३ गौरीचे, उपवन आणि नाळकंठ ग्रीन येथील दोन कृत्रीम तलावामध्ये ३ हजार १४५ मूर्तींचे व २११ गौरी, आंबेघोसाळे येथील कृत्रीम तलावात ७०८ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तसेच पारिसक येथे बांधलेल्या विसर्जन महाघाटावर १ हजार ५०८ गणेश मूर्ती व ९० गौरीचे, तर कोलशेत घाटासह इतर सात विसर्जन घाटांवर एकूण ३६४० गणेश मूर्तींसह ४७४ गौरीचे विसर्जन करण्यात आले. कळवा प्रभाग समितीअंतर्गत विविध विसर्जन घाटावर १ हजार ९८७ गणेश मूर्तींचे व १३४ गौरीचे विसर्जन केले.दरम्यान महापालिकेने निर्माण केलेल्या पर्यायी विसर्जन प्रक्रि येला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज होती. यामध्ये अनिरु ध्द अकॅडमी आॅफ डिझास्टर मॅनेजमेंटचे जवळपास ५०० स्वयंसेवक, १५० महापालिकेचे सुरक्षारक्षक, जीवरक्षक आणि अग्निशमन दलाचे जवान तैनात केले होते. (प्रतिनिधी)