शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘आवाहन करून पुतळे पाडतात, कुठे चाललोय आपण?’

By admin | Updated: January 24, 2017 05:46 IST

सावरकर आणि गांधी या दोन विचारसरणींवर आपला देश उभा आहे. गांधीवादाने गेली ७० वर्षे काय फळं मिळाली, ते भोगलंय

ठाणे : सावरकर आणि गांधी या दोन विचारसरणींवर आपला देश उभा आहे. गांधीवादाने गेली ७० वर्षे काय फळं मिळाली, ते भोगलंय. आता ३० वर्षे सावरकरांच्या मार्गाने जाऊन पाहा. सावरकरांना अपेक्षित राष्ट्रीय हिंदुत्वाची व्याख्या खरंच केली जाते. कुठे चाललोय आपण? वाट लावली देशाची. गडकरींचा पुतळा पाडला, तर पाच लाख देईन, असे लोकशाहीने निवडून दिलेला आमदार जाहीरपणे बोलतो. कानिटकरांचा पुतळा व दालन पाडा, ५ लाख बक्षीस देईन आणि हे करणाराच शिवाजी महाराजांना खरा अपेक्षित मराठा. कोणी आणि कुठून शोधून काढलं? या सगळ्यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र वाचावे, मग कळेल मराठा कोण, असे रोखठोक मत शरद पोंक्षे यांनी ठाण्यात व्यक्त केले. सुयश कला-क्र ीडा मंडळाच्या वतीने आयोजित सुयश व्याख्यानमालेत त्यांनी सावरकर विचारदर्शन या विषयावर पुष्प गुंफले. ज्यांची मराठी मातृभाषा आणि महाराष्ट्र मातृभूमी आहे, ते सगळे मराठा आहेत. मात्र, समाजात जातीचं विषं पेरत चाललं आहे आणि त्याला सगळे बळी पडताहेत. आरक्षण हे प्रगतीच्या आड येते आणि आरक्षणाच्या कुबड्या ज्यांनी आतापर्यंत घेतल्या, त्यांचे चांगले झाले नाही. आरक्षण हे जातीच्या नाही, तर आर्थिक निकषांवर असावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सावरकरांचे विचार कधीच शिळे होणार नाही. ते भूतकाळात जात नाहीत. प्रत्येक पिढीला ते तात्कालीक वाटतात. इतका विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन त्यांच्याकडे होता. मात्र, पिकते तिथे विकत नाही. याप्रमाणे सावरकर भारतात पिकले, पण विकले नाही. अस्पृश्यता निवारणाच्या बाबतीत फुले, आंबेडकरांचे कार्य महानच आहे. पण, कोणताही अन्याय सहन न करता जातीयतेविरुद्ध आवाज उठवणारे सावरकर मला त्यांच्यापेक्षा काकणभर मोठे वाटतात, असेही ते स्पष्टपणे म्हणाले. तर, ठरावीक लोकांना मोठं करण्याच्या नादात देशाचा इतिहास दाबला गेला, असे सांगून त्यांनी शिक्षणपद्धतीवरही टीका केली. (प्रतिनिधी)