शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Ambernath: आरोपींना न्यायालयात आणताना पोलिसांनी पत्रकारांना दिला चकवा

By पंकज पाटील | Updated: August 19, 2023 21:10 IST

Crime News: नंदकुमार ननावरे यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर ज्या आरोपींना अटक करण्यात आली होती. त्या आरोपींना आज उल्हासनगरच्या न्यायालयात आणताना पोलिसांनी पत्रकारांना चकवा देण्याचा प्रयत्न केला.

- पंकज पाटील

अंबरनाथ - नंदकुमार ननावरे यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर ज्या आरोपींना अटक करण्यात आली होती. त्या आरोपींना आज उल्हासनगरच्या न्यायालयात आणताना पोलिसांनी पत्रकारांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. काही आरोपींना मुख्य प्रवेशद्वारासमोरून आणले तर काही आरोपींना थेट मागच्या प्रवेशद्वारातून न्यायालयात आणण्यात आले.

ननवरे यांच्या आत्महत्या प्रकरणातील काही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार होते. पत्रकार देखील मुख्य प्रवेशद्वारा जवळ या आरोपींच्या चित्रीकरणासाठी थांबले होते. मात्र पोलिसांना याची कल्पना लागताच काही आरोपींना न्यायालयाच्या मागच्या प्रवेशद्वारातून कोर्टात आणण्यात आले, तर काही आरोपी मुख्य प्रवेशद्वारासमोरूनच आले. न्यायालयात आरोपीचे वकील यांनी युक्तिवाद करताना ननावरे दांपत्याच्या सुसाईड नोटमध्ये संबंधित आरोपींकडे चौकशी करा असा उल्लेख असल्यामुळे यांना थेट आरोपी करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले तर दुसरीकडे पोलिसांनी आरोपींकडे चौकशीसाठी 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींच्या वतीने एडवोकेट अर्जुन जयस्वानी यांनी बाजू मांडली.

'' शशिकांत साठे हे माझे स्वीय सहाय्यक आहे ही बाब जग जाहीर आहे. विधिमंडळातील माझें कामकाज देखील तेच पाहत असतात. मात्र साठे आणि ननावरे यांचे व्यक्तिगत संबंध काय होते आणि कसे होते याबाबत आपल्याला कल्पना नाही. मात्र सुसाईड नोटमध्ये जी नावे टाकण्यात आली होती त्यांच्याकडे चौकशी करावी अशी मागणी ननावरे यांनी केली होती. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात योग्य ती चौकशी करावी अशी आपली अपेक्षा आहे. - डॉक्टर बालाजी किणीकर (आमदार अंबरनाथ)

टॅग्स :ambernathअंबरनाथthaneठाणे