कोविड रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:41 IST2021-05-09T04:41:28+5:302021-05-09T04:41:28+5:30

कल्याण : कोरोनामुळे शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेल्या रुग्णांना घरच्या घरी ऑक्सिजन घेता यावा यासाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटरचे वाटप ...

Allocation of oxygen concentrator to covid patients | कोविड रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटरचे वाटप

कोविड रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटरचे वाटप

कल्याण : कोरोनामुळे शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेल्या रुग्णांना घरच्या घरी ऑक्सिजन घेता यावा यासाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटरचे वाटप शुक्रवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते डोंबिवली शिवसेना शाखेत करण्यात आले.

श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने कोरोनाबाधितांसाठी मोफत ऑक्सिजन बँक सुरू करण्यात आली आाहे. तिच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना या कॉन्सट्रेटर मशीनचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी डोंबिवली शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, शिवसेना वैद्यकीय मदतकक्ष प्रमुख मंगेश चिवटे, सदानंद थरवळ, तात्या माने, राजेश कदम, विश्वनाथ राणे, संजय पावशे, राहुल म्हात्रे, दीपेश म्हात्रे, एकनाथ पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

त्याचा लाभ कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांना घेता येणार आहे.

फोटो-कल्याण-श्रीकांत शिंदे.

----------------------

Web Title: Allocation of oxygen concentrator to covid patients