शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
5
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
6
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
7
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
8
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
9
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
10
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
11
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
12
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
13
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
14
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
15
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
18
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
19
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
20
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'त्यावेळी मी नाशिकला होतो, उत्तर भारतीयांना मारहाण केल्याचा आरोप अमान्य'; राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयात हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 13:09 IST

परीक्षेसाठी मुंबईत आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप होता. कलम ३१३ नुसार न्यायालयाने राज यांच्यासह सर्व सात आरोपींचे जबाब नोंदविले.

ठाणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चिथावणीखोर भाषणानंतर रेल्वेच्या २००८च्या भरतीवेळी मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण केल्याचा गुन्हा नोंद आहे. या प्रकरणी दाखल खटल्यातील आरोप आपल्याला अमान्य असल्याचा पुनरुच्चार राज यांनी बुधवारी ठाणेन्यायालयासमोर केला. कलम ३१३ नुसार न्यायालयाने राज यांच्यासह सर्व सात आरोपींचे जबाब नोंदविले. घटनेवेळी आपण नाशिक येथे असल्याचे त्यांनी सांगितले.

रेल्वेतील काही पदांसाठी अखिल भारतीय रेल्वे भरती मंडळाने १९ ऑक्टोबर २००८ रोजी परीक्षा घेतली. परीक्षेसाठी मुंबईत आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप होता. या संदर्भात कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात आकाश काळे, संतोष ठाकरे, विशाल कांबळे, कैलास चौबे, गणेश चौबे, शैलेश जैन आणि नीलेश घोणे यांच्याविरुद्ध २०१९ मध्ये आरोपपत्र दाखल झाले हाते.

आरोपींपैकी नीलेश याचा मृत्यू

पुरवणी आरोपपत्रात राज ठाकरे यांचेही नाव समाविष्ट झाले होते. आरोपींपैकी नीलेश याचा मृत्यू झाला. यापूर्वीच्या १२ डिसेंबर २०२५च्या सुनावणीसाठी सर्व आरोपी हजर राहण्याचे न्यायालयाने आदेश दिल्याने  राज यांच्यासह सर्व आरोपी हजर झाले होते.
  
बुधवारी ठाण्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत कुलकर्णी यांनी त्यांच्यावरील आरोपांबाबत विचारणा केली. तेव्हा यापूर्वीच्या जबाबाप्रमाणेच राज यांनी आपल्याविरुद्धचे पुरावे आणि आरोप खोटे असून ते अमान्य असल्याचे  स्पष्ट केले. 

खटल्याबद्दल आपल्याला काही सांगायचे आहे का? अशी न्यायालयाने विचारणा केल्यावर  त्या काळात आपण नाशिकला होतो, असे ते म्हणाले. ॲड.शैलेश सडेकर, सयाजी नांगरे आणि शुभम कानडे आदींनी राज यांच्यासह इतर आरोपींची बाजू मांडली. राज ठाकरे यांच्यासह इतर पाचही आरोपींचे जबाब नोंदविण्यात आले, तसेच दहा साक्षीदारही तपासण्यात आले. 

राज यांना पाहण्यासाठी वकिलांचीही गर्दी

राज ठाकरे ठाणे न्यायालयाच्या जुन्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावर मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत कुलकर्णी यांच्यासमोर सायंकाळी ४:०० वाजता हजर झाले. त्यावेळी राज यांना पाहण्यासाठी आणि खटल्याची सुनावणी ऐकण्यासाठी अनेक वकिलांनीही गर्दी केली होती. या गर्दीतही राज यांनी फोटो काढण्याचा कार्यकर्त्यांचा हट्ट पुरविला. जबाब नोंदविल्यानंतर २० मिनिटांनी राज ठाकरे न्यायालयाबाहेर पडले. 

कलम ३१३ नुसार राज ठाकरे यांचा न्यायालयाने जबाब नोंदविला. आपल्यावरील आरोप अमान्य असल्याचे त्यांनी जबाबात म्हटले. ते निर्दोष सुटतील, असा विश्वास आहे.
-ॲड.शैलेश सडेकर, राज यांचे वकील.

English
हिंदी सारांश
Web Title : Raj Thackeray denies charges in Thane court; claims alibi.

Web Summary : Raj Thackeray appeared in Thane court, denying charges of inciting violence against North Indian candidates in 2008. He claimed he was in Nashik during the incident. The court recorded his statement and examined witnesses.
टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेthaneठाणेCourtन्यायालयMNSमनसे