शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधवांच्या घरी आक्रोश, ठाण्यातील विटाव्यावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 18:34 IST

बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. यात एक होते अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधव. त्यांच्या निधनांचे वृत्त विटाव्यातील त्यांच्या घरी धडकताच कुटुंबीयांनी टाहो फोडला. 

ठाणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह पाच जणांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. याच अपघातात अजित पवार यांचे सुरक्षारक्षक पोलीस हवालदार (पर्सनल सेक्युरिटी ऑफीसर, पीएसओ) विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला. ते ४३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी संध्या (३८), मुलगी नेत्रा (१४) आणि मुलगा अद्वीत (१०) असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने ते वास्तव्याला असलेल्या ठाण्यातील विटावा भागात शोककळा पसरली आहे.

राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळेच अजित पवार यांचा बुधवारी बारामती दौरा होता. याच दौऱ्यामध्ये मुंबई पोलीस दलातील हवालदार जाधव यांचीही त्यांच्यासमवेत पीएसओ म्हणून डयूटी होती. 

सकाळी ८.१० चे विमानाचे मुंबईतून टेक ऑफ असल्यामुळे जाधव यांना मुंबईत ५.३० वाजता पोहचायचे होते. ते कौटुंबिक कार्यक्रमासाठी मंगळवारी खारीगाव येथील त्यांच्या सासूरवाडीमध्ये गेले होते. तिथूनच ते बुधवारी पहाटे ४ वाजता डयूटीसाठी रवाना झाले. त्यानंतर थेट त्यांच्या निधनाचेच वृत्त माध्यमांमध्ये झळकल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

या विमानात अजित पवार, विदीप जाधव (खासगी सुरक्षारक्षक), सुमित कपूर (पायलट कॅप्टन), संभवी पाठक (कॅप्टन) आणि पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट) हे प्रवास करत होते. जाधव हे विटावा येथील सूर्यानगर परिसरातील साई कृष्ण विहार इमारतीच्या बी-विंगमध्ये वास्तव्याला होते. 

मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरड गावचे ते रहिवासी होते. विदीप यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली. खारघर येथून त्यांची पत्नी, मुलगी तसेच विटाव्यातून आई आणि मुलगा असे संपूर्ण कुटूंबीय हे बारामतीकडे रवाना झाले. 

बारामतीपासून जवळच असलेल्या फलटण तालुक्यातील तरड गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

वडिलही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते

एकीकडे विदीप हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पीएसओ म्हणून तर मुंबईच्या कर्मवीर भाऊराव पाटील शाळेतून लिपीक म्हणून निवृत्त झालेले त्यांचे वडिल दिलीप हेही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ओळखले जातात. त्यांची पत्नी संध्या ही कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात औषध विभागात कार्यरत आहे.

रुबाब कधीच दाखविला नाही

विदीप हे उपमुख्यमंत्र्यांचे अंगरक्षक असले तरी त्यांनी आपल्या पदाचा कधीच कोणालाही रुबाब दाखविला नाही. ते बॉडीगार्ड म्हणून खूप कमी लोकांना परिचित होते. त्यांची पोलीस अशीच ओळख होती. 

२००९ मध्ये मुंबई पोलीस दलात भरती झालेले विदीप हे गेल्या चार वर्षांपासून पवार यांचे अंगरक्षक होते. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटूंबीयांसह मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे, अशी प्रतिक्रिया जाधव कुटूंबियांचे विटाव्यातील निकटवर्तीय विजय पवार यांनी व्यक्त केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's PSO Videep Jadhav Dies in Baramati Plane Crash

Web Summary : Ajit Pawar's PSO, Videep Jadhav, tragically died in a Baramati plane crash. The 43-year-old's death has brought grief to his family and community in Thane. He is survived by his parents, wife, and two children. Jadhav was with Pawar on duty during the accident.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाthaneठाणेBaramatiबारामती