शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
3
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
4
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
5
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
6
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
7
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
8
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
9
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
10
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
11
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
12
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
13
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
14
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
15
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
16
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
17
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
18
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
19
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
20
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये वकिलांचे कामबंद आंदोलन; कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 00:03 IST

पोलीस अधिकाऱ्याकडून मारहाण, तातडीने कारवाई करण्याची केली मागणी

उल्हासनगर : वकील सागर वासवानी यांना मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुराडकर यांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ वकील संघटनेने बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले. सुराडकर यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. छोटू पॅथोलिया यांनी व्यक्त केला आहे.

उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुराडकर यांच्याविरोधात वकील संघटना आक्रमक झाली आहे. वकिलाला मारहाण केल्याचा निषेध वकील संघटनेने करून बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले. गेल्या आठवड्यात वासवानी यांना एका सिव्हीलप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी सुराडकर व वासवानी यांच्यातील चर्चेच्यावेळी सुराडकर यांनी कानशिलात मारल्याचा आरोप वासवानी यांनी केला.

याबाबत तालुका वकील संघटनेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. तसेच सुराडकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. पोलीस अधिकारी सुराडकर यांच्याविरोधात अनेक तक्रारी असल्याचेही वकील संघटनेचे म्हणणे आहे. सुराडकर यांच्या म्हणण्यानुसार वासवानी यांच्याविरोधात त्यांच्या एका नातेवाइकांनी तक्रार केली. त्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

चौकशीदरम्यान वासवानी बॅग टाकून पोलीस ठाण्यातून पळून गेले. अखेर, नातेवाइकांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांना मारहाण झाल्याचा आरोप चुकीचा व खोटा असून तक्रार आल्यानंतर त्याची खातरजमा करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.त्यामध्ये कोणीही अडथळा आणू नये, असेही सुराडकर म्हणाले. सुराडकर व उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जावळे यांच्या कार्यपद्धतीविरोधात शहरात असंतोष निर्माण झाला असून विधानसभा निवडणुकीपूर्वी दोघांच्या बदलीची मागणी शहरात जोर धरू लागली आहे.गुन्हेगारीवर अंकुश, अधिकाºयांबाबत नाराजीपोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलीस परिमंडळातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात यश आले. मात्र, मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुराडकर व उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जावळे यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांत नाराजी आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही अधिकाºयांच्या बदलीची मागणी होत आहे.