शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वेतन आयोगसह एकस्तरसाठी आश्रमशाळांच्या शिक्षकांकडून अपर आयुक्त धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 19:47 IST

आदिवासी विकास विभागाच्या येथील अपर आयुक्त कार्यालयाच्या नियंत्रणातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार या अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील आश्रम शाळा व वसतिगृह आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणे व पालघर जिल्ह्यातील आश्रम शाळेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना प्रलंबित मागण्यांसाठी धारेवर धरले.

ठळक मुद्देगलथानपणा विरोधात प्रशासनास चांगलेच धारेवरसातव्या वेतन आयोग व एकस्तर वेतन आदी प्रलंबितआश्रमशाळा व वसतिगृहातील रिक्त पदे भरावीत

ठाणे : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील आश्रम शाळा व वसतिगृह मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. मात्र यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोग व एकस्तर वेतन आदी प्रलंबित मागण्यासाठी शुक्रवारी शिक्षकांनी जव्हार येथील प्रकल्प अधिकारी व येथील अपर आयुकत कार्यालयाच्या गलथानपणा विरोधात प्रशासनास चांगलेच धारेवर धरून प्रकल्प अधिकाऱ्यांस घेराव घातला            आदिवासी विकास विभागाच्या येथील अपर आयुक्त कार्यालयाच्या नियंत्रणातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार या अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील आश्रम शाळा व वसतिगृह आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणे व पालघर जिल्ह्यातील आश्रम शाळेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना प्रलंबित मागण्यांसाठी धारेवर धरले. येथील अपर आयुक्त कार्यालयाच्या गलथान व निष्काळजीपणासह प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या मनमानीमुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगासह एकस्तर वेतनास वंचित राहावे लागत असल्याचा आरोप शिक्षकांकडून करण्यात आला आहे .          संतापलेल्या या कर्मचाऱ्यांनी एकात्मिक आदिवासी विकासचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी खेडकर व लिपीक इंगळे यांना जव्हार येथे घेराव घालून त्यांच्या निष्काळजी व हलगर्जीपणाची जाणीव करून देत मागण्यांचे निवेदन सुपुर्द केले. यामध्ये आश्रमशाळा व वसतिगृहातील रिक्त पदे भरावीत, ७ वा वेतन आयोगानुसार वेतन निश्चित करणे, अध्यादेश जारी होऊनही एकस्तर वेतन लागू करण्यास विलंब झाला. ते त्वरीत लागू करावे, कर्मचाऱ्यांचे स्थायित्वाचे आदेश देण्यात यावे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे लाभ देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन शिक्षकांनी देऊन अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

टॅग्स :thaneठाणेTeacherशिक्षक