शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

फलक अन् पोस्टरवर कारवाई होणार

By admin | Updated: January 3, 2017 05:36 IST

शहरातील रस्ते आणि पदपथ अडवून विविध राजकीय पक्ष, मंडळे तसेच विविध संस्थांनी बेकायदा फलक उभारले असून त्यामुळे नागरिकांना येथून चालणे कठीण झाले आहे.

ठाणे : शहरातील रस्ते आणि पदपथ अडवून विविध राजकीय पक्ष, मंडळे तसेच विविध संस्थांनी बेकायदा फलक उभारले असून त्यामुळे नागरिकांना येथून चालणे कठीण झाले आहे. त्यामुळे या सर्वच फलकांवर तत्काळ कारवाई करावी अशी एकमुखी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत लावून धरली. त्यानुसार हे फलक तत्काळ काढण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्तांना दिल्या जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले. शहराच्या विविध भागातील रस्ते आणि पदपथांवर लोखंडी फ्रेममध्ये फलक उभारले असून यामध्ये राजकीय पक्ष, मंडळे आणि विविध संस्था आघाडीवर आहेत. तसेच अनेक ठिकाणी राजकीय पक्ष तसेच विविध संघटनांनी झेंड्यासाठी खांब उभे केले आहेत. रस्त्यावर उभारलेल्या फलकामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. तसेच पदपथाच्या मधोमध ते उभारल्याने त्या ठिकाणाहून नागरिकांना चालणे शक्य होत नाही. यामुळे अपघात होऊ शकतात.या संदर्भात शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दशरथ पालांडे यांनी असे बेकायदा फलक आणि खांब कोणत्याही पक्षाचे असो सर्व ठिकाणी एकसारखीच कारवाई करावी आणि नागरिकांना चालण्यासाठी पदपथ मोकळे करून द्याावेत, अशी मागणी केली. मात्र, ती कोणत्या भागातून सुरू करावी, यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये जुंपली. वागळे इस्टेट भागातील आयटीआय सर्कलपासून ती कारवाई सुरू करावी, अशी विरोधकांनी मागणी लावून धरली. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वागळे इस्टेट परिसरातून ती झाल्यास सत्ताधारी अडचणीत येण्याची शक्यता होती. त्यामुळे सुरुवात इतर ठिकाणापासून करावी, अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी लावून धरली. अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशाप्रकारची कारवाई शहरात सुरू आहे. (प्रतिनिधी)