शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाले, वाहनांवर कारवाई

By admin | Updated: May 13, 2017 00:56 IST

गावदेवी परिसरासह स्टेशन, जांभळीनाका, सॅटीस या भागात ठाणे महापालिकेची फेरीवालाविरोधी कारवाई शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच होती.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गावदेवी परिसरासह स्टेशन, जांभळीनाका, सॅटीस या भागात ठाणे महापालिकेची फेरीवालाविरोधी कारवाई शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच होती. शुक्रवारी फेरीवाल्यांची संख्या तुरळक होती. परंतु, सॅटीसखाली बेकायदा पार्क केलेल्या दुचाकी मात्र पालिकेच्या अतिक्रमण विभागाने जप्त केल्या. तसेच स्टेशन ते जांभळीनाक्यापर्यंत रस्त्यांवर बेकायदा पार्क केलेल्या वाहनांची हवा काढण्यात आली. या वेळी काही ठिकाणी किरकोळ वादही झाल्याचे दिसून आले. परंतु, जोपर्यंत स्टेशन परिसरातील फेरीवाले हद्दपार होत नाहीत, तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी दिला. ठामपा उपायुक्त संदीप माळवी यांच्यावरील हल्ल्यानंतर गुरुवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे स्थानक व गावदेवी भागाचा दौरा करून गावदेवी येथील २७ गाळे जमीनदोस्त केले. त्यानंतर ठाणे स्थानक परिसरात बेशिस्तपणे उभ्या रिक्षाचालकांनाही चोप दिला होता. या कारवाईमुळे या भागात महिनाभर तरी फेरीवाले बसणार नाहीत आणि बेशिस्त रिक्षाचालकांना शिस्त लागेल, अशी चर्चा शहरात सुरू झाली होती. मात्र, कारवाईला २४ तासही पूर्ण होत नाहीत, तोच शुक्र वारी सकाळपासून स्थानक परिसरात फेरीवाले ठाण मांडून बसले. तसेच स्थानक भागात रिक्षाचालकांनी मनाला वाटेल त्याप्रमाणे रिक्षा उभ्या केल्या. शुक्रवारी सायंकाळी ठामपा पथकाने पोलीस बंदोबस्तात स्थानक परिसरात कारवाई केली. आयुक्त जयस्वाल हे काही कामानिमित्त दिल्लीला गेले असल्यामुळे अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. सुरुवातीला गावदेवी परिसरात या पथकाने परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली. तिची माहिती मिळताच स्थानक भागातील फेरीवाल्यांनी आपला गाशा गुंडाळला होता. गावदेवीमधील कारवाईनंतर हे पथक ठाणे स्थानकाच्या दिशेने निघाले. अशोक टॉकीज, स्थानक परिसर या भागात फेरीवाले आधीच पळून गेल्याने पालिकेच्या पथकाच्या हाती फारसे काही लागले नाही. मात्र, या कारवाईदरम्यान स्थानकाबाहेर उभ्या करण्यात आलेल्या दुचाकी वाहतुकीस अडथळा ठरत असल्याची बाब पथकाच्या निदर्शनास आली. त्यामुळे या भागातील दुचाकी हटवून हा परिसर वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे आदेश रणखांब यांनी दिले.