शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पैशाच्या वादातून मालकाचाच खून करुन पसार झालेल्या आरोपीस १९ वर्षांनी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 01:19 IST

पैशाच्या वादातून सिप्रेम जोसेफ रेगो (५३,रा. डोंबिवली) या आपल्याच मालकाचा खून करुन पसार झालेल्या राजाराम राजीव शेट्टी (६५) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने तब्बल १९ वर्षांनी गुरुवारी अटक केली. या खूनाच्या यशस्वी तपासाबद्दल युनिट एकच्या तपास पथकाचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी अभिनंदन केले आहे.

ठळक मुद्दे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई पोलीस आयुक्तांनी केले तपास पथकाचे अभिनंदन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पैशाच्या वादातून सिप्रेम जोसेफ रेगो (५३,रा. डोंबिवली) या आपल्याच मालकाचा खून करुन पसार झालेल्या राजाराम राजीव शेट्टी (६५) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने गुरुवारी अटक केली. त्याला रामनगर (डोंबिवली) पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.डोंबिवलीतील सुखनिवास लॉज येथे राहणारे रेगो यांच्याशी त्यांचा देखभाल करणारा राजाराम शेट्टी याच्याबरोबर पैशांवरुन भांडण झाले होते. हे भांडण विकोपाला गेल्यामुळे राजाराम याने रेगो यांच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारुन त्याचा खून करुन ८ मे २००१ रोजी पलायन केले होते. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी राजाराम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तो कर्नाटक राज्यातील कुद्र ( जिल्हा-उडपी ) येथील रहिवाशी असल्यामुळे गावी तसेच महाराष्टÑातील नाशिकसह वेगवेगळया जिल्हयांमध्ये वास्तव्य करीत होता. त्यामुळेच तो पोलिसांना मिळत नव्हता. यातील आरोपीला शोधण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले होते. दरम्यान, तो ठाण्यातील विटावा ब्रिजजवळ येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार आनंदा भिलारे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक, हवालदार भिलारे, सुनिल जाधव, पोलीस नाईक रिजवान सय्यद, नीलम पाचपुते आणि राहुल पवार आदींच्या पथकाने १९ नाव्हेंबर २०२० रोजी विटावा येथे रेल्वे ब्रीजजवळ सापळा रचून राजाराम याला ताब्यात घेतले. या तपासासाठी मोहन भानुशाली यांचे तपास पथकाला विशेष सहकार्य मिळाले. गेली १९ वर्षे पसार झालेल्या राजाराम याच्याविरुद्ध सीआरपीसी २९९ नुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.* तब्बल १९ वर्षे पाठपुरावा करुन आरोपीला अखेर मोठया कौशल्याने अटक केल्याने युनिट एकच्या तपास पथकाचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी अभिनंदन केले आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक