काळ्या जादूच्या बतावणीने गंडा घालणारा गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 09:48 IST2026-04-16T09:46:06+5:302026-04-16T09:48:01+5:30
Thane Crime News: घरावर केलेली काळी जादू उलटवण्यासाठी पूजा विधी करण्याच्या नावाखाली अडीच काेटींची फसवणूक करणाऱ्या भाेंदू मंजूनाथ उर्फ दीक्षित बाबा याला गाेव्यात अटक करण्यात आली आहे.

काळ्या जादूच्या बतावणीने गंडा घालणारा गजाआड
ठाणे - घरावर केलेली काळी जादू उलटवण्यासाठी पूजा विधी करण्याच्या नावाखाली अडीच काेटींची फसवणूक करणाऱ्या भाेंदू मंजूनाथ उर्फ दीक्षित बाबा याला गाेव्यात अटक करण्यात आली आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पाेलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी याबाबत बुधवारी माहिती दिली.
ठाण्यातील कासारवडवली पाेलिस ठाण्यात एका महिलेने मंजुनाथविरुद्ध तक्रार दिली हाेती. नातेवाइकांसह वडिलांच्या मैत्रिणीने कुटुंबावर काळी जादू केली असून, ती उलटवण्यासाठी पूजा विधी करावा लागेल. तो केला नाही, तर माेठे नुकसान हाेईल. वडिलांच्या जिवाला धाेका हाेईल, अशी भीती दाखवत मुंबईतील मंजूनाथ या भाेंदूने ठाण्यातील या महिलेच्या कुटुंबाकडून ऑनलाइन एक काेटी ६६ लाख ५० हजार २८७ रुपये आणि साेन्याचे दागिने असा सुमारे अडीच काेटींचा ऐवज लुबाडला हाेता.