‘केरला स्टोरी’वरील टीकेमुळे जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 22:59 IST2023-05-10T22:57:53+5:302023-05-10T22:59:39+5:30
याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी बुधवारी सांगितले.

‘केरला स्टोरी’वरील टीकेमुळे जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल
ठाणे : ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला भर चौकात फाशी दिली पाहिजे, असे वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात वर्तकनगर पोलिस ठाण्यात बदनामीचा गुन्हा संतोष जयस्वाल यांनी दाखल केला. याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी बुधवारी सांगितले.
बुधवार १० मे रोजी दाखल झालेल्या या तक्रारीमध्ये जयस्वाल यांनी म्हटले आहे की, एका वृत्तवाहिनीवर बातम्या पाहत असताना आव्हाड यांनी ५ मे रोजी प्रसारित झालेल्या ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट कपोलकल्पित गोष्टींवर आधारित असून, या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला भरचौकात फाशी दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले, तसेच या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. आव्हाड यांनी चित्रपटाची व दिग्दर्शकाची बदनामी केली असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.