शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

८८ ग्रा.पं होणार हागणदारी मुक्त

By admin | Updated: September 26, 2015 22:23 IST

राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यातील ८८ ग्राम पंचायतींमध्ये युद्धपातळीवर जनजागृती करून त्याना २ आॅक्टोंबरपर्यंत हागणदरी मुक्त करण्याचा

ठाणे: राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यातील ८८ ग्राम पंचायतींमध्ये युद्धपातळीवर जनजागृती करून त्याना २ आॅक्टोंबरपर्यंत हागणदरी मुक्त करण्याचा संकल्प ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था विभागाने केला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील गावपाड्यांमध्ये ३१ आॅक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान राबवले जात आहे. या जिल्हास्तरीय अभियानाचा शुभारंभ भिवंडी तालुक्यातील रहनाळ गावात शुक्रवारी करण्यात आला. खासदार कपील पाटील यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मानसी बोरकर यांनी या जिल्हास्तरीय कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करून हा संकल्प केला. ८८ ग्राम पंचायतींचे सरपंच,उपस्थित गावकरी, जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्राम सेवक, आदींना स्वच्छतेची शपथ देऊन हागणदरीमुक्त होण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला. जिल्ह्यात सुमारे ४२५ ग्राम पंचायती आहेत. त्यातील ८८ ग्राम पंचायती २ आॅक्टोबरपर्यंत हागणदरी मुक्त करायच्या आहेत. महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी ग्राम सभा घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी या ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्याचे घोषीत करणार आहेत. यासाठी या ग्राम पंचायतींमधील प्रत्येक घरासाठी शौचालय बांधण्यासाठी गावागावांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. जिल्ह्यात सध्यास्थितीला सुमारे ३७ हजार शौचालये असल्याचा दावा केला जात असून या वर्षात ४२ हजार शौचालये बांधण्यासाठी नियोजन केले आहे. (प्रतिनिधी)