शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

अ‍ॅमेझॉन कंपनीच्या कर्मचा-यांकडून चोरीचे ५७ मोबाईल पोलीसांनी केले जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:31 AM

भिवंडी : डिलेव्हरी डॉट कॉम या कुरीयर कंपनीकडून अ‍ॅमेझॉन कंपनीस परत दिलेल्या मालातील २६७ मोबाईल परस्पर चोरीस गेल्याची तक्रार नारपोली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. हे चोरीचे मोबाईल विक्री करण्यास शहरात आलेल्या चौकडीकडून भिवंडीच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ५७ मोबाईल व ३ लॅपटॉप जप्त केले आहेत. या चौकडीत अ‍ॅमेझोन कंपनीच्या कर्मचा-यांचा ...

ठळक मुद्दे डिलेव्हरी डॉट कॉम कंपनीकडून अ‍ॅमेझॉन कंपनीचे २६७ मोबाईल चोरीस गेल्याची तक्रारअ‍ॅमेझॉन कंपनीचा माल चोरीत डिलेव्हरी डॉट कॉम व अ‍ॅमेझॉन कंपनीतील कर्मचारी सामिलशहरातील वंजारपाटी नाका येथे चौकडीकडून ५७ मोबाईल व ३ लॅपटॉप जप्त

भिवंडी : डिलेव्हरी डॉट कॉम या कुरीयर कंपनीकडून अ‍ॅमेझॉन कंपनीस परत दिलेल्या मालातील २६७ मोबाईल परस्पर चोरीस गेल्याची तक्रार नारपोली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. हे चोरीचे मोबाईल विक्री करण्यास शहरात आलेल्या चौकडीकडून भिवंडीच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ५७ मोबाईल व ३ लॅपटॉप जप्त केले आहेत. या चौकडीत अ‍ॅमेझोन कंपनीच्या कर्मचा-यांचा समावेश आहे.तालुक्यातील माणकोली नाका येथे इंडियन कॉर्पोरेशनच्या गोदाममध्ये डिलेव्हरी डॉट कॉम या कुरीयर कंपनीचे कार्यालय आहे.अ‍ॅमेझोन कंपनीच्या आॅनलाईनवरून ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तू डिलेव्हरी डॉट कॉम कंपनी मार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचविल्या जात होत्या.परंतू ग्राहकांनी वस्तू स्विकारण्यास नकार दिल्यास अथवा ग्राहकाचा पत्ता न सापडल्यास सदरच्या वस्तू डिलेव्हरी डॉट कॉम ही कुरीयर कंपनी पुन्हा माघारी अमेझॉन कंपनी कडे पाठवीत होती. परंतु मागील चार महिन्यात अमेझॉन कंपनीस मिळणा-या वस्तूंची गोळाबेरीज जमत नसल्याने त्यांनी डिलेव्हरी डॉट कॉम कंपनी कडे तक्रार केली. त्यानुसार कुरीयर कंपनीचे सुरक्षा अधिकारी मंगेश मोहिते यांनी नारपोली पोलीस स्टेशनमध्ये २४ लाख रु पयांचे २६७ मोबाईल परस्पर अपहार झाल्याची तक्रार नोंदविली.दरम्यान डिलेव्हरी डॉट कॉम मधील कर्मचारी उमेश गुळवी, टेम्पो चालक हुसैन रफिकुद्दीन तसेच अमेझॉन कंपनीचे माजी कर्मचारी संदीप सराफ व सचिन पटाळे हे आपल्याकडील महागडे मोबाईल शहरातील वंजारपाटीनाका येथे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास मिळाली. त्यांनी वंजारपाटीनाका येथे सापळा रचून चौकडीच्या मुसक्या आवळल्या.त्यामधून अ‍ॅमेझोन कंपनीच्या चोरीस जाणा-या वस्तूंचा धक्कादायक प्रकार समोर आला.अ‍ॅमेझोन कंपनीच्या ज्या किमती वस्तू डिलेव्हरी डॉट कॉम कुरियर कंपनीकडे माघारी येत होत्या त्या वस्तू कंपनीचा कर्मचारी उमेश गुळवी हा अमेझॉन कंपनीकडे परत पाठवित होता. त्या दरम्यान गुळवी हा या वस्तूंच्या कार्टून वरील सील ड्रायव्हरच्या मदतीने बाहेर काढून त्यामधील किमती मोबाईल , लॅपटॉप हे परस्पर बाजूला काढून रिकामे बॉक्स कार्टून मध्ये ठेवून ते कार्टून अमेझॉन कंपनीस पाठवित होता. तसेच या टोळीत सामील असलेले अ‍ॅमेझोन कंपनीतील कर्मचारी संदीप सराफ व सचिन पटाळे हे कार्टूनमधील मालाची कोणतीही शहनीशा न करता कार्टून ताब्यात घेण्याचे काम नियमीत करीत होते. आॅक्टोबर २०१७ पासून हि टोळी अशा पद्धतीने काम करीत असल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने वंजारपाटी नाका येथे पकडलेल्या चौकडीकडून ५७ मोबाईल व ३ लॅपटॉप असा पंधरा लाख रूपयांचा माल जप्त केला आहे.सोमवारी भिवंडी न्यायालयात त्यांना हजर केले असता शनिवार १७ फेब्रुवारी पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे या टोळीत सामिल असलेले कर्मचारी चोरीच्या मालासह पकडले जातील,अशी माहिती माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी दिली आहे . विशेष म्हणजे अ‍ॅमेझॉन कंपनीच्या व्यवस्थापकाने या घटनेबाबत कोणतीही तक्रार नोंदविली नाही,या बाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrimeगुन्हा