शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखडा ४४५ कोटींचा

By admin | Updated: January 8, 2016 02:54 IST

ठाणे जिल्ह्याच्या २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या ४४५ कोटींच्या विकास आराखड्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या

ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या ४४५ कोटींच्या विकास आराखड्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत मंजुरी मिळाली आहे. मंजूर केलेले हे वार्षिक आर्थिक नियोजन या वर्षाच्या तुलनेत सुमारे ५.३ टक्केने अधिक आहे. चालू वर्षाकरिता मंजूर नियतव्यय २५२ कोटी ३३ लाख रुपये आहे. यात भरीव वाढ करून सुमारे ४४५ कोटींच्या या विकास आराखड्यास अल्पशा सुधारणा करून सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. यामध्ये ग्रामीण भागाच्या विकासासह कृषी आणि पायाभूत सुधारणांसाठी भरीव तरतूद केली आहे.सुमारे ९५ टक्के निधी हा जिल्हास्तरीय योजनांसाठी आहे. यातील गाभाक्षेत्रासाठी सुमारे दोन तृतीयांश (२/३) व बिगर गाभाक्षेत्रासाठी एक तृतीयांश (१/३)तरतूद केली आहे. उर्वरित ५ टक्के निधीपैकी ४.५० टक्के रक्कम नावीन्यपूर्ण योजना व ०.५० टक्के रक्कम मूल्यमापन, संनियंत्रण व जिल्हा नियोजन समितीच्या बळकटीकरणासाठी आहे.गाभा क्षेत्रातील कृषी व संलग्न सेवांसाठी ५७ कोटी ६९ लाखांची तरतूद आहे. ग्रामविकास २२ कोटी ४८ लाख ३६ हजारांची, पूरनियंत्रणासाठी १६ कोटी ६२ लाख २९ हजारांची तरतूद केली आहे. सामाजिक सेवांसाठी ७१ कोटी ४९ लाखांची भरीव तरतूद आहे. या सर्वांवर सुमारे १६८ कोटी ३० लाख खर्च करण्यात येणार आहे. याप्रमाणेच बिगर गाभाक्षेत्रासाठी ८४ कोटी ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यापैकी ऊर्जेसाठी सहा कोटी, उद्योग व खाण ५३ कोटी ६६ लाख, परिवहन ५२ कोटी ६५ लाख, सामान्य आर्थिक सेवांसाठी १४ कोटी ५५ लाख ३४ हजार, सामान्य सेवा इतर कार्यक्र मांकरिता १० कोटी ४० लाखांची तरतूद करण्यात आली अहे.